Mumbai : KDMC मधील फाईल्सची होते हेराफेरी ? 5 फाईल्स गहाळ प्रकरणी शिपाई निलंबित

आयुक्तांच्या आदेशानुसार अभियंत्यांना करचे यांनी कारणे दाखवा नोटीसीची प्रक्रिया करत
कल्याण-डोंबिवली पालिका
कल्याण-डोंबिवली पालिका sakal
Updated on

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातून पाच फाईल्स गहाळ झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालिका प्रशासनाने एका शिपायाला निलंबित केले आहे. बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांच्या नकळत हे प्रस्ताव तयार केले असल्याने आयुक्तांनी हे प्रस्ताव रोखले होते. याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्याच प्रस्तावाच्या फाईल्स गहाळ झाल्याची घटना घडल्याने पालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केडीएमसी मध्ये फाईल्सची हेराफेरी होते का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तसेच या सर्व घटनांमुळे पालिका अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याची बाब उघड होत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राातील सुस्थितीत असलेले डांबरीकरणचे रस्ते कॉंक्रीटीकरण करण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. शहर अभियंता विभागाकडून हा प्रस्वात मंजुरीसाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या दालनात अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला. या प्रस्तावाविषयी आयुक्तांना संशय आल्याने त्यांनी हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पाच अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. या कार्यवाहीसाठी आयुक्तांच्या दालनातून रस्ते कामाच्या फाईल या सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनात पाठविण्यात आल्या होत्या.

आयुक्तांच्या आदेशानुसार अभियंत्यांना करचे यांनी कारणे दाखवा नोटीसीची प्रक्रिया करत फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे आवश्यक असताना त्या फाईल्स वरिष्ठांकडे गेल्या नाहीत. आयुक्तांनी संबंधित विभागाला विचारणा केल्यानंतर त्या पाच फाईल्स गायब झाल्याची बाब उघड झाली. फाईल सापडत नसल्याने त्या हाताळणाऱ्या शिपायाकडे विचारणा करण्यात आली. त्याला याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले असता फाईल हाताळणाऱ्या शिपायाला आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे.

या प्रकरणात पालिका प्रशासनाने शिपायाला निलंबित केले असले तरी या फाईल्स दालनाच्या बाहेर गेल्या कशा. यामध्ये अधिकाऱ्यांची गडबड झाली की आणखी काही काळे बेरे यामागे होते. पालिका आयुक्तांच्या नकळत कामाचे प्रस्ताव तयार होतात कसे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

महापालिकेच्या मुख्यालयात सामान्य नागरिकांना अधिकारी वर्गास भेटण्याकरीता दुपारी तीन वाजल्यानंतर सोडले जाते. महापालिका मुख्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यत तर कधी कधी रात्री आठ पर्यंत ठेकेदारांचा राबता असताे. एखादी फाईल या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरवायची असल्यास ती फाईल शिपायाच्या माध्यमातून फिरवली गेली पाहिजे.

मात्र काही वेळेस ठेकेदारच या फाईल स्वतः घेऊन विविध विभागात जाताना दिसतात. काही मंडळींकडून त्या फाईलची झेराॅक्स प्रत महापालिकेच्या नजीकच्या झेराॅक्स दुकानातून काढली जाते. हे सगळे प्रकार बिनबोभाट सुरु असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.