ठाकरे गटाला खुश करण्यासाठी... काँग्रेस आमदाराने हायकमांड विरोधात थोपटले दंड, स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

Congress MLA Zeeshan Siddique news: उबाठाचे नेते हे बिल्डर लोकांची दलाली करतात. काँग्रेस व उबाठाची युती ही अनैसर्गिक आहे. ती आज असेल तर उद्या नसेल, अशी टीका सिद्दिकी केली आहे.
uddhav thackeray nana patole
uddhav thackeray nana patole
Updated on

मुंबई- काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी उबाठावर तोफ डागली आहे. उबाठाने मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय केला. उबाठाने माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकास कामं करू शकलो नाही .माझ्यावर अन्याय होत होता, पण हायकमांड मला गप्प रहायला सांगायचे. उबाठाचे नेते हे बिल्डर लोकांची दलाली करतात. काँग्रेस व उबाठाची युती ही अनैसर्गिक आहे. ती आज असेल तर उद्या नसेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

असं होत असेल तर ही कार्यकर्त्यांची हार आहे. पक्षाच्या बैठकीला दुसरा कोणता नेता येतो तर ते चुकीचं आहे. मी काँग्रेसचा सिटिंग आमदार आहे. काँग्रेसने ही हिंमत ठेवावी की आमचा तिकडे उमेदवार आहे.त्यांनी सांगाव की ही आमची जागा आहे. पण मित्र पक्षाला खुश करण्यासाठी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना संपवत चालली आहे आणि हे दुर्भाग्य पूर्ण आहे, असं देखील सिद्दकी म्हणाले.

uddhav thackeray nana patole
Mumbai Dahisar: बापरे! सोसायटी मीटिंगमधील वाद, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून केला वेगळा

मी काँग्रेसचा आमदार आहे, मी नक्कीच निवडणूक लढवणार. काँग्रेसला यावर भूमिका मांडावी लागेल.वरुण सरदेसाई यांना विचारावं की ते बैठकीला का आले? ते उबाठामध्ये खुश नाहीत का? का ते काँग्रेसमध्ये येत आहेत. इतर नेत्यांना पक्षाच्या बैठकीला बोलवतात हे चुकीचं आहे. पण, मला बोलवलं नाही जनता सर्व बघत आहे, असं ते म्हणाले.

मला जरी उमेदवारी नाही मिळाली तरी मी निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. जनता माझ्यासोबत आहे. कोणत्या पक्षासोबत जाऊन लढायचं ही मी जनतेत जाऊन ठरवणार.२०१९ ला मी उबाठाच्या उमेदवाराला हरवलं होत. तेव्हा जनता माझ्या सोबत होती. ठाकरे गटाने कोणताही विकास केला नाही. मी विकासकामं केली. ऊबाठाचे काही नेते पूर्ण वेळ बिल्डरसोबत असतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

मी मविआचा विरोध असा केला की माझ्या मतदार संघातच उबाठाने माझ्यावर अन्याय केला. माझ्या मतदारसंघात उद्घाटन असायचे पण मला बोलवले नाही जायचे. मविआच्या आमदाराला जो फंड मिळायला पाहिजे होता तो फंड मला मिळायचा नाही. मी सर्व गोष्टींची तक्रार हायकमांडकडे करायचो पण काही उत्तर नाही मिळायचं, असं सिद्दकी म्हणाले.

नाना पटोले म्हणतात की मविआ म्हणून ते पुढे जाणार आहेत, तर मग जा पण तुमच्या आमदारांसाठी पण लढा ना. तुमच्या सारखे नेते आमच्यासाठी नाही लढले तर मग आम्ही कुठे जाणार? मी अनेक वेळा माझ्यावर जो अन्याय झाला त्याची तक्रार हायकमांडकडे करायचो. अनिल परब माझ्यावर अन्याय करायचे पण मला दिल्लीतून फोन यायचा की तू गप्प बस तुझ्यामुळे मविआ मध्ये फूट पडेल, असं ते म्हणाले.

uddhav thackeray nana patole
Ajit Pawar: कार्यक्रमात 'एकच वादा अजितदादा'ची घोषणा, पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये घेतली कार्यकर्त्यांची फिरकी

क्राँस वोटिंगच आता त्यांना एक कारण मिळालं. पक्षाने मला बैठकीत पण बोलवलं नाही. पण पक्षाने जे सांगितले ते मी केले. पक्षाने तो कागद दाखवावा की जो त्यांनी मला मतदान करायला दिला होता. जे पक्षाने सांगितले ते मी केले. काही पक्षाच्या नेत्यांना वाटत की मला हटवलं तर त्यांच्या रस्त्यातील काटा बाजूला होईल.

आतापर्यंत माझ्यावर अन्यायच झाला पण. पण मला अपेक्षा आहे की माझ्यासोबत न्याय व्हावा. उम्मीद पर दुनिया कायम है, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.