मुंबईत ११ जूनला कोसळू शकतो मुसळधार पाऊस

काय म्हटलय हवामान विभागाने?
 rain in Nashik
rain in NashikGoogle
Updated on

मुंबई: मुंबई आणि आसपासच्या भागात ११ जूनला मुसळधार पाऊस (heavy rain fall) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (weather department) वर्तवला आहे. आठ ते दहा जून दरम्यान हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर बंगाल तसेच आसपासच्या शहरी किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने कोकण,मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात 11 जून पासून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. (Mumbai likely to witness heavy rainfall from June 11)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने राज्यातील अनेक भागात 11 जून पासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस म्हणजे 15 ते 16 जून पर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 rain in Nashik
मुंबईकरांसाठी चांगली बातमी! रुग्णदुपटीचा कालावधी ५५० दिवसांवर

रायगड , रत्नागिरी मध्ये 'रेड अलर्ट'

11 जून रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून हा वेग ताशी 60 किलोमीटर वेगापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यासह 10 आणि 11 जून रोजी गोव्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 rain in Nashik
Video: धावती ट्रेन पकडण्यासाठी तरूणाने मारली उडी अन्...

असा परिणाम होऊ शकतो

मुसळधार पावसामुळे कोकणात पूर तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात

समुद्र किनाऱ्याजवळील भागात वादळी वारे वाहतील

अनेक महागात पाणी साचून रस्ते बंद होण्याचा धोका आहे.

धोकादायक किंवा जुनी घरे/बांधकामे कोसळण्याची शक्यता

पाणी तसेच वीज सेवा खंडित होऊ शकते.

झाडे तसेच जीर्ण बांधकाम कोसळण्याचा धोका

रस्ते,रेल्वे,विमान आणि बोट सेवा प्रभावित होऊ शकते

केरळामध्ये 3 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर तो वेगाने महाराष्ट्राकडे सरकला. शनिवार तो दक्षिण कोकणात पोहोचला. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह ठाणे,मुंबई आणि नवी मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस बरसला. केरळाहुन मान्सून ज्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झाला त्यावरून तो राज्यातील भागात ही वेगाने पसरण्याची अपेक्षा होती मात्र आज मान्सूनने फारशी प्रगती केली नसल्याची माहिती कुलाबा वेध शाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.