दारूच्या नशेत शनिवारी विलेपार्ले आणि पवई येथे झालेल्या दोन वेगवेळ्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात विमानतळाजवळील उड्डाणपुलावर घडला. सांताक्रूझ येथील जडेन जिमी, जलाल धीर, सार्थक कौशिक आणि साहिल मेहता या चौघांनी शनिवारी रात्री मद्यप्राशन केले व त्यानंतर फेरफटका मारण्यासाठी मध्यरात्री गोरेगावहून मोटारीने वांद्रे येथे आले.