Mumbai Local: दोन महिन्यात ९ लाखापेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई!

Without Ticket Railway Travellers : तब्बल ६३.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Mumbai Local: दोन महिन्यात ९ लाखापेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
Updated on

Railway: मध्य रेल्वेने गेल्या दोन महिन्यात विना तिकिट प्रवास करणाऱ्या ९.०४ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. त्याच्याकडून तब्बल ६३.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ४.०७ लाख फुकटे प्रवासी एकट्या मुंबई विभागात आढळून आले.

तिकिट खिडक्यांवरील गर्दी, सुट्टया पैशांची चणचण तर कधीकधी उशिर होत असल्याने प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या टिसीद्वारे कारवाई केली जाते. उपनगरीय लोकलसह लांब पल्याच्या मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये देखील विना तिकिट प्रवासी प्रवास करतात.

Mumbai Local: दोन महिन्यात ९ लाखापेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते मे २०२४ या दोन महिन्यांत अनेक संपूर्ण मध्य रेल्वेवर तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेंतगर्त मध्य रेल्वेने ९.०४ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत.

त्याच्याकडून तब्बल ६३.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकट्या मुंबई विभागात ४.०७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली असून त्याच्याकडुन रु.२५.०१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे मे-२०२४ या महिन्यात, मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या ४.२९ लाख प्रकरणांमधून २८.४४ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो या महिन्याच्या २७.७४ कोटी रुपयांच्या महसूल उद्दिष्टापेक्षा २.५४ टक्यांची जास्त आहे.

Mumbai Local: दोन महिन्यात ९ लाखापेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा सिग्नल बिघाड, मुंबईकरांचे प्रचंड हाल

ग्राफिक्स

एप्रिल ते मे-२०२४

विभाग - फुकटे प्रवासी - दंड

मुंबई विभाग - ४.०७ लाख- २५.०१ कोटी.

भुसावळ विभाग- १.९३ लाख - १७.०७ कोटी .

नागपूर विभाग- १.१९ लाख - ७.५६ कोटी.

सोलापूर विभाग- ५४.०७ हजार - ३.१० कोटी.

पुणे विभाग ८३.१० हजार -६.५६ कोटी.

मुख्यालयाला ४६.८१ हजार - ४.३० कोटी

Mumbai Local: दोन महिन्यात ९ लाखापेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
Mumbai Local Update : डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.