Mumbai Local Breaking : लोकलमधून प्रवास करतांना पाससोबत आता ओळखपत्रही कंम्पलसरी ! 

Tickets
Tickets
Updated on

Mumbai Local Breaking : नितीन बिनेकर : गेल्या काही दिवसांपासून बनावट यूटीएस आणि लोकल पासच्या घटना वाढल्याने रेल्वेच्या डोकेदुखीत भर पडली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार लोकल प्रवासादरम्यान पासधारकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान कार्ड यापैकी एक मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हा नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

मुंबईत मध्य-पश्चिम रेल्वे मिळून दररोज तीन हजारहून अधिक लोकल फेऱ्या होतात. यामधून दैनंदिन ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Tickets
Mumbai local : मुंबई लोकलमुळे जगाला मिळाला हा शब्द !

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने यूटीएस ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट/ पासची सुविधा दिली आहे; परंतु फुकट्या प्रवाशांनी यावर शक्कल लढवत सॉफ्टवेअरच्या साह्याने बनावट पास तयार केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पासधारकांची नोंद राखण्यासाठी मध्य रेल्वेने नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

प्रवासासाठी जुना पास दाखवून नवीन पास यापूर्वी सहज उपलब्ध होत होता; मात्र पासचे नूतनीकरण करण्यासाठी आधार कार्ड किंवा इतरपैकी एक ओळखपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. याच्याच पुढे जात ज्या ओळखपत्राच्या आधारावरून प्रवाशांनी पास काढले ते ओळखपत्र प्रवास करताना जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच तिकीट तपासणीदरम्यान टीसीने मूळ ओळखपत्राची मागणी केल्यास मूळ प्रत किंवा ‘डीजी लॉकर’मधील ई-ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे. त्यात मोबाईलमधील फोटो कॉपी चालणार नाही. ओळखपत्र नसल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

Tickets
Mumbai Local Viral Video : लोकलच्या महिला डब्यात घुसला साप ; गोधळ अन् ... वाचा पुढे काय झालं ?

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उपनगरीय रेल्वेच्या पासधारक प्रवाशांनी प्रवासदरम्यान ओखळपत्र सोबत ठेवावीत. प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. ए. के. सिंह, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकलच्या गर्दीत पाकीटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे अनेक जण मूळ ओळखपत्र सोबत ठेवत नाहीत. रेल्वे पास काढताना मूळ ओळखपत्र दाखवल्यानंतर प्रवाशांना पास मिळतो. त्यानंतर मूळ ओळखपत्र बाळगण्याचा अट्टहास का, प्रवाशांना नाहक त्रास देण्याचा हा प्रकार आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ

Tickets
Mumbai local Viral Video : मुंबईकरांचं कौतुक करू तितकं कमी ; तुम्ही हा व्हीडिओ बघितला आहे का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.