Mumbai Local Breaking: 'तो' सरकता जिना एका रात्रीत झाला बंद !

Mumbai Local Breaking: प्रवाशांनी ट्विट करत रेल्वे प्रशासन तसेच उद्घाटनासाठी आलेल्या सत्ताधाऱ्यां वर केली टीका
Mumbai Local Breaking: 'तो' सरकता जिना एका रात्रीत झाला बंद !
Updated on

Mumbai Local Breaking: गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रवासी वाट पाहत असलेल्या रेल्वे स्थानकातील सरकते जिने गुरुवारी रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचा हा आनंद मावळ्याचे दिसून आले.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना एका रात्रीत बंद पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी ट्विट करत रेल्वे प्रशासन तसेच उद्घाटनासाठी आलेल्या सत्ताधाऱ्यां वर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Local Breaking: 'तो' सरकता जिना एका रात्रीत झाला बंद !
Mumbai : आमदारांच्या परदेश दौऱ्याला परराष्ट्र खात्याची मंजुरी; राज्यातील २२ आमदार रवाना

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकातील सरकते जिने सुविधा गुरुवारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली. ठाकुर्ली येथे पूर्वेला हा सरकता जिना बसविण्यात आले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या जिन्यावर काम सुरू होते. मध्यंतरी हे काम रखडल्याने देखील नागरिकांनी ट्विट करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर सर्व कामे मार्गी लागल्यानंतर गुरुवारी प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

ठाकुर्ली स्थानकातील सरकता जिन्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी मोठा गाजावाजा करत स्वयंचलित जिन्याचा शुभारंभ केला. ही सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शुक्रवारी पहाटे प्रवाशांचा हा आनंद मावळला.

Mumbai Local Breaking: 'तो' सरकता जिना एका रात्रीत झाला बंद !
Mumbai News : फेरीवाल्यांच्या मुजोरीचा होत आहे स्थानिक नागरीकांना त्रास !

शुक्रवारी पहाटेपासून ते जिने बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कौस्तुभ देशपांडे, मंदार अभ्यंकर या दक्ष प्रवाशांनी त्यासंदर्भात ट्विट करून रेल्वेला तक्रार देऊन नाराजी व्यक्त केली. शुभारंभ करताना सगळी काळजी घेऊन चाचण्या करून ती सेवा सुरू केली जाते तर मग हे जिने अचानक बंद कसे झाले. की बंद ठेवले? तसेच जर सकाळी 7 नंतर सुरू करण्याचे ठरवले असेल तर तसे कोणी ठरवले आणि का? असा सवालही त्यांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे.

ज्या राजकारणी नेत्यांनी येथे येऊन ते सुरू केले त्या नेत्यांनी आता बंद का ठेवले ? याची कारणमीमांसा स्पष्ट करून रेल्वेला जाब विचारणा करावी असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. सुविधा सुरू करायची आणि बंदही करायची हे काही बरोबर नाही. सेवा देताना ती अव्याहत सुरू ठेवणे हे रेल्वेचे कर्तव्य आहे.

Mumbai Local Breaking: 'तो' सरकता जिना एका रात्रीत झाला बंद !
Mumbai Crime: रिक्षा चोरास अंबरनाथमधून अटक, पोलिसांनी केल्या 4 रिक्षा हस्तगत अन्...

टेक्नोसॅव्ही होताना ती अखंड द्यावी. तसेच मध्यरात्री शेवटची लोकल गेल्यावर हवं तर बंद करून पहाटे निदान 5 वाजता ती सेवा सुरू असायला हवी, पण तसे झाले नाही. त्यामुळे झटपट प्रवासाची हमी देणाऱ्या रेल्वेने ती सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचे नियोजन फसले अशी टीका त्यांनी केली. डोंबिवली पूर्वेला जी यंत्रणा आहे ती देखील नेहमी बंद असते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. रेल्वे यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने त्या स्वयंचलीत जिने संदर्भात कार्यवाही करून सेवा तात्काळ सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.