Mumbai Local: गर्दीच्यावेळी एक्सप्रेसमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाश्यांविरोधात मध्य रेल्वे आक्रमक; केली मोठी कारवाई

Mumbai Local: आठ मेल- एक्सप्रेस गाड्यांत सरप्राईज तिकीट तपासणी !
Mumbai Local: गर्दीच्यावेळी एक्सप्रेसमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाश्यांविरोधात मध्य रेल्वे आक्रमक; केली मोठी कारवाई
Updated on

Mumbai Local: लोकलच्या गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी सर्रासपणे मेल- एक्सप्रेसमधून प्रवास करतात.

त्यामुळे मध्य रेल्वेने बुधवारी रात्री मुंबईतून जाणाऱ्या आठ मेल- एक्सप्रेसमध्ये सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेतंर्गत तब्बल १६२ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ७८ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दररोज रात्री मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षण डब्यातून सर्रासपणे उपनगरीय रेल्वे प्रवासी ठाणे, कल्याण,कसारा आणि कर्जतपर्यत प्रवास करतात. त्यामुळे मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांची चांगली गैरसोय होते. अनेकदा उपनगरीय प्रवासी आणि मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांमध्ये भांडणे सुद्धा झाली आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेने मेल-एक्सप्रेस गाड्यामधून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतले आहे. बुधवारी मुंबईतून जाणाऱ्या ८ मेल- एक्सप्रेस गाड्यांत ३७ तिकीट तपासणीसांनी सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत तब्बल १६२ प्रवासी मेल- एक्सप्रेस गाड्यांचा आरक्षण डब्यातून प्रवास करत असल्याचे आढळून आले. रेल्वेने त्यांच्यावर कारवाई करत त्याच्याकडून ७८ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या गाड्या तपासणी -

ट्रेन क्रमांक ११००९ सिंहगड एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२१०९ पंचवटी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १७६१२ राज्य राणी एक्सप्रेस,ट्रेन क्रमांक १२१०५ विदर्भ एक्सप्रेस,ट्रेन क्रमांक १२१३७ पंजाब मेल- एक्सप्रेस,ट्रेन क्रमांक १२१११ अमरावती एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १७४११ महालक्ष्मी एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक १२३२२ कोलकाता मेल सुपरफास्ट या आठ गाड्यात सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.