Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलीसाचा बळी

Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलिसाचा बळी
Mumbai Local Crime:sakal
Updated on

Mumbai local news: मोबाईल चोरट्यांच्या पाठलाग करताना गर्दुल्याच्या ट्रॅपमध्ये फसलेल्या एका पोलिस जवानाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. २८) ला ही घटना घडली आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला असून, तपासासाठी १२ विविध तपास पथके तयार केली आहेत. या घटनेनंतर मुबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

यामध्ये मृतक पोलिसाचे नाव विशाल पवार असून ते मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रागार विभागात (एलए) कार्यरत होते. रविवारी विशाल पवार यांनी ठाण्यावरुन स्लो लोकल पकडली, तेव्हा ते सिव्हील ड्रेसमध्ये होते. रात्री ९.३० दरम्यान माटुंगा ते सायन या स्थानकादरम्यान लोकलचा वेग कमी झाला होता.

Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलिसाचा बळी
Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

त्यावेळी विशाल मोबाईलवर बोलत असताना त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आला. यावेळी लोकलचा वेग कमी असल्याने विशाल यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. त्यानंतर विशाल यांना गर्दूल्यांनी घेरले आणि त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना विषारी द्रव्य पाजले. दुसऱ्या दिवशी त्यांना शुद्ध आल्यानंतर ते आपल्या घरी परतले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला होता. मात्र उपचार चालू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.

Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलिसाचा बळी
Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू

१२ चौकशी पथके

ही घटना दादर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी १२ पथके तयार केली आहेत. यामध्ये सहा लोहमार्ग पोलिस,४ मुंबई शहर पोलिस आणि दोन अंमली पदार्थविरोधी शाखेचे पथक आहेत.

फुटेजची तपासणी

मृत विशाल जेव्हा शुद्धीवर आले होते, त्यावेळी त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे पोलीस आता चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करत आहे. तसेच माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचीही तपासणी सुरु आहे.

Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलिसाचा बळी
Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश
Mumbai Local Crime: विषारी इजेंक्शन टोचून गर्दुल्यांनी घेतला पोलिसाचा बळी
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.