Mumbai Local Dombivli: डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकते जिने वारंवार बंद ,नागरिकांना प्रशासन जुमानेना

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दिवस हे सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असते.
Mumbai Local
Mumbai Local Esakal
Updated on

Dombivali Escalator Frequently Stops - दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दिवस हे सरकते जिने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. याविषयी नागरिक रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत मात्र त्यांच्या तक्रारींना केराची टोपली अधिकारी वर्गाकडून दाखविली जात आहे.

बुधवारी दुपारी डोंबिवली स्थानकातील सरकते जिने बंद असल्याची तक्रार रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी डोंबिवली स्टेशन मास्तरकडे केली असता सुरुवातीला त्यांना जिने चालू असल्याचे सांगत स्टेशन मास्तरांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी चे वातावरण आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र महिन्यातील मोजके दिवस सोडले तर इतर दिवशी हे सरकते जिने बंद असल्याने प्रवाशांना त्यावरुन चढत प्रवास करावा लागतो. याचा ज्येष्ठ नागरिक, सामानाची वाहतूक करणारे प्रवासी, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांसह दिव्यांग नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्माच्या त्रासाने प्रवास करुन आल्यानंतर जिने चढून प्रवास करणे शक्य होत नाही. (Latest Marathi News)

सरकते जिने बंद असल्याच्या तक्रारी वारंवार प्रवासी रेल्वे स्टेशन मास्तरांकडे करत असतात. परंतू त्यांना मेटनन्ससाठी जिने बंद असल्याचे कारणे सांगून माघारी पाठविले जाते. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक दिव्यांग महिला प्रवासी डोंबिवली स्थानक परिसरातून प्रवास करत होती. सरकता जिना बंद असल्याने तिला जिना चढून स्थानकात जाने शक्य होत नव्हते. प्रवाशांसाठी असलेली लिफ्ट देखील बंद असल्याने एका सहप्रवाशाने सदर मुलीला उचलून घेऊन जिने चढून प्रवास केला.

Mumbai Local
PM Modi Sandeshkhali Visit: संदेशखालीतील पीडित महिलांची मोदींनी घेतली भेट; जाणून घेतलं पीडित महिलांचं दुःख

याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांना समजताच त्यांनी चौकशी केली असता मेन्टेनन्स करीता लिफ्ट आणि एक्सेलेटर बंद आहे असे उत्तर अरगडे यांना मिळाले. यावर त्यांनी स्टेशन मास्तरांकडे जाऊन एकाच वेळी लिफ्ट व सरकते जिने यांचे मेटनन्स का काढण्यात आले अशी विचारणा केली. यावर त्यांनी दोन्ही सुविधा चालू असल्याची माहिती अरगडे यांना दिली. (Latest Marathi News)

त्यांना अरगडे यांनी दोन्ही बंद असल्याचे व्हिडीओ दाखविले व स्वतःची ओळख सांगितले. यानंतर त्यांनी एक्सेलेटर ऑपरेटरला बोलाविले, मात्र 15 मिनिटे उलटून गेली तरी ऑपरेटर आला नाही अशी माहिती अरगडे यांनी दिली आहे. यासोबतच रेल्वे स्थानक परिसरात तिकीट घराजवळ फेरीवाल्यांचा विळखा असतो याचीही माहिती अरगडे यांनी स्टेशन मास्तरांना दिल्यानंतर त्यांनी आरपीएफ कडे बोट दाखवित आपली जबाबदारी झटकली.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील कारभार म्हणजे अस्ताव्यस्त झालेला नाही. येथील अधिकाऱ्यांवर कोणताही अंकुश राहीलेला नाही. न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. याविषयी वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे अरगडे यांनी यावेळी सांगितले.

Mumbai Local
Shahjahan Sheikh Handover to CBI : संदेशखालीच्या आरोपीला CBIकडं सोपवा; हायकोर्टाचे बंगाल सरकारला कडक शब्दात निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.