रेल्वेकडून बंदिस्त नाल्यांची पहिल्यांदाच यंत्राने सफाई
मुंबई: मध्य रेल्वेच्या बंदिस्त नाल्यांची (Closed Drains) पहिल्यांदाच 'फायरेक्स' यंत्राद्वारे सफाई करण्यात आली आहे. बंदिस्त नाल्यांमध्ये कामगार उतरू न शकल्याने गाळ बाहेर काढण्याचे आव्हान महानगर पालिकेसमोर (BMC) दर वर्षी असते. यंदा महापालिकेने या अडचणीवर मात केली आहे. त्यामुळे दर वर्षी पाणी तुंबल्याने प्रवाशांचा होणारा खोळंबा (Halted Trains) थांबण्यास मदत होणार आहे. 'फायरेक्स यंत्रातील (Advanced Machinery) पाण्याच्या जोरदार प्रवाहाने गाळ नाल्याच्या बाहेर ढकण्यात येतो. त्यानंतर त्याची सफाई केली जाते. यंत्राद्वारे केली जाणारी ही सफाई मोहीम ४ जूनला पूर्ण करण्यात आली. (Mumbai Local may not face problems in this rainy season as close drains cleaned with advanced machinery)
रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या बंदिस्त नाल्यांची सफाई रेल्वे प्रशासनाकडून केली जाते. त्यासाठीचा खर्च पालिका देत असते. गेल्या वर्षी पालिकेने काही बंदिस्त नाल्यांचीही 'रोबो'च्या सहाय्याने सफाई केली होती. खुल्या नाल्यांची सफाई सोपी असते; मात्र बंदिस्त नाल्यांची सफाईसाठी कामगार आत उतरू शकत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने बंदिस्त नाल्यांची सफाईची विनंती पालिकेला केली होती. त्यानंतर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड दरम्यानच्या १८ पैकी १५ नाल्यांची सफाई पूर्ण केली. 'फायरेक्स यंत्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहाने गाळ नाल्याच्या बाहेर ढकण्यात येतो. त्यानंतर त्याची सफाई केली जाते. यंत्राद्वारे केली जाणारी ही सफाई मोहीम ४ जूनला पूर्ण करण्यात आली.
१५ नाल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मशीद स्थानकादरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळीदरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळदरम्यान, परळ ते दादरदरम्यान जगन्नाथ भातणकर पुलाखाली, दादर ते माटुंगादरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीवदरम्यान, शीव ते कुर्लादरम्यान कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहूरदरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नीला आणि मुलुंड ते ठाणेदरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. दर वर्षी कुर्ला-शीवदरम्यान पाणी साचून रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.