पोलीसांची सतर्कता आणि माय लेकरांची भेट; वाचा सविस्तर प्रसंग

सोनी सिंग आणि त्यांच्या सासू लोकलमध्ये चढू शकल्या नाहीत आणि लोकल निघून गेली.
Police
PoliceSakal
Updated on

भाईंदर : मुंबईतील रेल्वे लोकलमधील गर्दीमुळे ताटातूट झालेल्या माय लेकरांची भेट पोलीस अधिकार्‍याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे घडली आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकार्‍याने दाखवलेल्या समयसूचकतेचे कौतूक होत आहे.

हेल्मेट बाबत जनजागृती करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मिरा रोड ते गेट वे ऑफ इंडीया अशी सायकल फेरी काढली होती. सायकल फेरी संपल्यानंतर हे पोलीस रेल्वे मार्गे परत येत असताना अंधेरी रेल्वे स्थानकात दोन महिला भेदरलेल्या अवस्थेत लोकलमध्ये बसल्या. या महिलांची पोलीस उपनिरिक्षक उज्वल आरके यांनी विचारपुस केली. या महिलेचे नाव सोनी सिंग असे होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सासुबाई होत्या.

सिंग या अंधेरीहून विरारला जाण्यासाठी स्थानकात आल्या होत्या. त्यांच्या सोबत अनुराग, अनुपम, अनुज आणि मुलगी प्रगती ही अवघी 5 ते 11 वर्षे वयाची मुले होती. विरार लोकल आल्यानंतर त्यांनी आधी मुलांना लोकलमध्ये चढवले मात्र गर्दी जास्त असल्यामुळे सोनी सिंग आणि त्यांच्या सासू लोकलमध्ये चढू शकल्या नाहीत आणि लोकल निघून गेली. त्यामुळे त्यांची मुलांपासून ताटातूट झाली. रेल्वेबाबत फारशी माहिती नसलेल्या दोन्ही महिला घाबरुन रडू लागल्या. हे तपशील समजताच उज्वल आरके यांनी तात्काळ रेल्वे नियंत्रण कक्षाला त्याची माहिती दिली तसेच रेल्वे पोलीसांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांनाही मुलांची माहिती दिली. त्यामुळे रेल्वे नियंत्रण कक्ष तसेच रेल्वे पोलीसांनी ही माहिती सर्व रेल्वे स्थानकांना दिली.

चक्रे वेगाने फिरल्यामुळे चारही मुले विरारच्या दिशेने जाणार्‍या लोकलमध्ये बोरिवली स्थानकात सापडली. त्यानंतर त्यांची आपल्या आईशी भेट घालून देण्यात आली. उज्वल आरके यांनी सतर्कता दाखवत  रेल्वे नियंत्रण कक्ष तसेच रेल्वे पोलिस या यंत्रणांशी ततकाळ संपर्क झाल्यामुळेच ही मुले लवकर सापडली त्यामुळे आरके यांचे वरिष्ठांकडून कौतूक करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()