Mumbai Local
Mumbai Local Esakal

Mumbai Local: मुंबईतील लोकल सेवा सुरळीत, 'या' मार्गावरील रेल्वे गाड्या सुरू

Mumbai Rain: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपले आहे. अशात काल झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.
Published on

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपले आहे. अशात काल झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ज्याचा चाकरमान्यांनी फटका बसला होता. अशात नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील बहुतांश मार्गावरील लोकल सेवा सुरळीत झाली आहे.

मध्य रेल्वेच्या CPRO ने दिलेल्या माहितीनुसार, "पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक सकाळी 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकानुसार 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत."

मध्य रेल्वेच्या गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने

दरम्यान मुंबईसह उपनगरांमधील विस्कळीत झालेली लोकल आणि रेल्वे सेवा आज पुन्हा रुळावर आल्याचे चित्र आहे. असे असले तरी सलग दुसऱ्या दिवशी देखील मध्य रेल्वेच्या गाड्या गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. याबाबतच्या सूचना कल्याण रेल्वे स्टेशनवरून देण्यात येत आहे. अशा परिस्थितीतही कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे.

Mumbai Local
CNG-PNG Price : सीएनजी अन् पीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ; मुंबईत नेमका दर किती?

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे, मुंबई विद्यापीठातील आज (9 जुलै 2024) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्या असून, नवीन तारखा लवकरच जाहीर होतील अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

Mumbai Local
Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) कर्नाटक, गोवा अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि या राज्यांसाठी आज, 9 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे.

एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी, मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे अनेक गाड्या आणि उड्डाणे रद्द करण्यात आली. समुद्राच्या भरतीमुळे परिस्थिती चिघळल्याने, रेल्वे रुळ आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. तसेच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.