Latest Mumbai News: पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी ते गोरेगाव यादरम्यान पूल क्रमांक ४६चे पुनर्निर्माण करण्यासाठी १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक १६ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता सुरू होऊन १७ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता संपेल. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.