Mumbai News: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आणि सार्वजनिक सुट्टी असल्याने फिरायला निघालेल्या मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागला. मध्य आणि पश्चिम रेल्वेने गुरुवारी सुट्टी असल्याने रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालवल्याने गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
शाळकरी मुले, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता सकाळी घराबाहेर पडले होते; मात्र स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे रविवारी वेळापत्रकांनुसार लोकल चालविल्याने त्यांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला. तसेच, सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील पर्यटनस्थळी फिरायला मोठ्या प्रमाणात मुंबईकर घराबाहेर पडलेले होते. त्यांनासुद्धा रविवार वेळापत्रकाचा मोठा फटका बसला.
विशेष म्हणजे, शासकीय सुट्टी असली तरी खासगी कार्यालये सुरू होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली.
रेल्वेने स्वातंत्र्यदिनी सुटीच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. सोमवार ते शुक्रवार मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दिवसभरात ८९४, हार्बर मार्गावर ६०८, तर ट्रान्स हार्बर मार्गावर २६२ लोकल आणि नेरूळ-खारकोपर मार्गावर ४० लोकल धावतात. म्हणजे दिवसभरात १,८१० फेऱ्या होतात. रविवार वेळापत्रकात मुख्य मार्गावर ६८७, हार्बर मार्गावर ४९९, तर ट्रान्स हार्बर मार्गावर २४६ लोकल चालविण्यात येतात. म्हणजेच रविवार वेळापत्रकात लोकलच्या ३३६ फेऱ्या कमी असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.