Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Updated on

Mumbai Local News : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल, कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या, तसेच दिवा-वसई आणि दिवा-पनवेल-रोहा-पेण मार्गावरील मेमू गाड्या असा पसारा दिवा स्थानकाचा वाढला आहे. मात्र या स्थानकाचे नाव दिवा असले तरी वाढती गर्दी, अपुरे पोलिस बळ, मर्यादित जलद लोकलसह इतर सुविधांचा अंधारच पसरला आहे.

त्यातूनच अधूनमधून प्रवाशांच्या संतापाचा भडका उडतो. आता अमृत योजनेंतर्गत दिवा स्थानकाचा कायापालट होणार आहे, पण केवळ रंगरंगोटीचा दिखावा नको तर लोकलची संख्या वाढवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Mumbai : मासळीविक्रीचे नवे केंद्र करंजा; ससून डॉकला पर्याय, खवय्यांसाठी पर्वणी

दिवा स्थानकातून मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी आणि कल्याण दिशेला लोकल धावतात. याशिवाय पनवेल, वसई, कोकण, कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने शेकडो गाड्या सुटतात. सरासरी रोज दहा लाखांचे उत्पन्न या स्थानकातून रेल्वेच्या तिजोरीत जमा होते.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Mumbai Crime : आठवडाभरापूर्वी बाहेर आला, पुन्हा घडली जेलची वारी

जंक्शनचा दर्जा असलेल्या या स्थानकाचा २०११ मध्ये देशातील आदर्श स्थानकांत समावेश करण्यात आला होता; पण त्यावेळची आणि आताची परिस्थिती पाहिली तर हे आदर्श स्थानक आता बेशिस्त बनत चालले असल्याचेच दिसून येत आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत अपुऱ्या सुविधा हे दिवा स्थानकाचे मुख्य दुखणे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Jalgaon Bribe Crime : चाळीसगाव ‘तहसील’मधील लिपिकास लाच घेताना अटक

जलद लोकल दिखाव्यासाठीच

२०१५ मध्ये झालेल्या आंदोलनानंतर दिव्यामध्ये जलद लोकललाही थांबा मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दिव्यातून मुंबई दिशेला जाण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ३६ लोकल थांबतात.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा

असे असले तरी यापैकी १६ जलद लोकल या खोपोली, कर्जत, कसारा येथून येतात. आधीच खचाखच भरलेल्या या लोकलमध्ये दिव्यामध्ये प्रवाशांना शिरताच येत नाही. हीच परिस्थिती मुंबईहून दिवा गाठताना होते. फरक इतकाच आहे की, सकाळी लोकलमध्ये चढता येत नाही आणि सायंकाळी दिवा स्थानकात उतरता येत नाही.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Nashik CIDCO Crime : लहान मुलांच्या भांडणातून युवकाचा खून; सिडकोतील घटना

ऐन पावसाळ्यात छतावर पत्र्यांचे काम

कोकणात जाणाऱ्या गाड्या फलाट क्रमांक सातवर, तर मुंबईत येणाऱ्या गाड्या फलाट क्रमांक आठवर थांबतात. या फलाटांवर अर्धवट छत असल्याने भर उन्हात, पावसात गाडी पकडावी लागत होती. ऐन पावसाळ्यात पत्रे बसवण्याचे काम सुरू आहे.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Crime News : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलीसांचा छापा, एकाला अटक

आरोग्य केंद्रावर गर्दुर्ल्ल्यांचा ताबा

जानेवारी २०१९ मध्ये स्थानकासाठी प्राथमिक उपचार केंद्र उभारले आहे. मात्र सात वर्षांपासून तयार असलेले आरोग्य केंद्र फलाटांपासून दूर असल्याने ते आजही बंद आहे. हे आरोग्य केंद्र सध्या गर्दुल्ल्यांचे, भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे, तर आसपासच्या कचऱ्यामुळे हे केंद्रच जणू आजारी पडल्याचे चित्र आहे. सभोवताली चिखल, कचरा साचला असून आतापर्यंत एकाही प्रवाशाला या केंद्रातून वैद्यकीय मदत पुरवली गेली नाही.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Jalgaon Crime : दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लंपास

आठ फलाटांसाठी एकच शौचालय

शौचालय ही प्राथमिक गरज पूर्ण करण्यातही प्रशासन अपयशी ठरले आहे. आठ फलाट असलेल्या या स्थानकासाठी केवळ एकच शौचालय आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची तासनतास प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांनाही शौचालयासाठी फलाट क्रमांक एक गाठावे लागते. दिवा स्थानकातील फलाट ५, ६ वरून दिवा-रोहा, दिवा-पनवेल, दिवा-वसई गाड्या, तसेच काही कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुटतात. त्यांच्यासाठी जानेवारी महिन्यात शौचालयाचे काम सुरू झाले तरी अजून ते पूर्ण झालेले नाही.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Maharashtra Politics : झेंडावंदनाच्या यादीवरून राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित पवार कोल्हापूरला जाणार नाहीत?

सुरक्षेची ऐशीतैशी

पूर्वी केवळ धीम्या लोकल थांबत असलेल्या दिवा स्थानकात २०१५ मध्ये झालेल्या रेल आंदोलनानंतर काही जलद गाड्यांनाही थांबा देण्यात आला. मात्र वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याकामी पोलिस प्रशासनाने हात टेकले आहेत. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे तेथे रोजच प्रवाशांमध्ये भांडणे वाढत आहेत.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Chaha Poli : चहा-पोळी खा अन् वजन नियंत्रणात ठेवा

असे असतानाही दिवा रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रशासनाने अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. स्थानकाच्या एका टोकाला रेल्वे पोलिस चौकी असून त्यातही अपुरे मनुष्यबळ आहे. केवळ दहा ते बारा पोलिसांना स्थानकातील आठ फलाटांवर लक्ष ठेवावे लागत आहे. गर्दीत अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवासी करत आहेत.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Maharashtra Politics : झेंडावंदनाच्या यादीवरून राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित पवार कोल्हापूरला जाणार नाहीत?

प्रवाशांचे हाल

कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या असल्यामुळे फलाटावर विश्रांतीगृह, शौचालय व कोच इंडिकेटर, प्रकाश व्यवस्था, रस्ते आदी मूलभूत सुविधा असणे क्रमप्राप्त आहे, पण नेमक्या याच सुविधा दिवा स्थानकात नाहीत. स्थानकातून आपल्या सामानासकट बाहेर पडायला साधा रस्ताही नसल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.

Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे
Mumbai Crime : महिला विनयभंग प्रकरण; नीलम गोऱ्हे यांचे लोहमार्ग पोलीस आयुक्तांना पत्र

विश्रांतीगृह नसल्याने प्रवाशांना जमिनीवरच बसावे लागत आहे. दिव्यात रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणातील गाड्यांना गेल्या चार वर्षांपासून थांबा दिला तरी दिवा स्थानकात सुविधांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()