Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai Local News dadarsakal
Updated on

Mumbai News: मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ९-१० वरील खाद्यपदार्थ स्टॉल बुधवारपासून (ता.२२) बंद करण्यात आले.

त्यामुळे भर उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याचा पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर वणवण फिरत असल्याचे चित्र दिसून आले. प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर वापरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावीत याकरिता खाद्यपदार्थ स्टॉल दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai News : तब्बल तीन तास बरणीमध्ये अडकला श्वान, अथक प्रयत्नानंतर सुटका

मुंबई शहरातील सर्वात गजबजलेले आणि गर्दी असणारे स्थानक अशी दादर रेल्वे स्थानकाची ओखळ आहे. कोणत्याही वेळेला दादर रेल्वे स्थानकावर गर्दी पहायला मिळते. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेसचे जंक्शन असल्याने दादर रेल्वे स्थानकात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

त्यामुळे प्रवाशांची दादर स्थानकात नेहमीच गर्दी असतात. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लँटरफॉर्ममध्ये काही सुधारणा करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वीच प्लँटफॉर्म क्रमांक ८ ची रुंदी वाढविण्यात आली आहे. आता दादर स्थानकाचा प्लॅटफॉर्म ९ आणि १० च्या मध्यभागी असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉल परेल ऍण्डला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खाद्यपदार्थ स्टॉलधारकाना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.mum

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai North West: वायव्य मुंबई मतदारसंघात मतदानाचा कल अनिश्‍चित! मतदान वाढल्यानं चुरस

प्रवाशांची गैरसोय ?

वाढत्या तापणामुळे प्रवासी अगोदरच हैरान झाले आहेत. त्यात बुधवारी दादर रेल्वे स्थानकांचा प्लॅटफॉर्म ९-१० वरील खाद्यपदार्थ स्टॉल बंद झाल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरवावे लागले आहे. तसेच प्रवाशांना रेल्वेच्या पाणपोईवर अवलंबून राहावे लागले आहे. खाद्यपदार्थ स्टॉल बंद करण्यापूर्वी पर्यायी स्टॉल उपलब्ध करून देणे गरजेचे होत अशी प्रतिक्रिया योगेश गोयेकर यांनी दिली.

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता

स्टॉल इथे नकोच -

रेल्वेने खाद्यपदार्थ स्टॉलधारकांसाठी उपलब्ध करून दिलेली जाग प्लॅटफॉर्म ९ आणि १० चा परेल ऍण्डला असून तिथे रेल्वेचे स्वच्छतागृह आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ स्टॉल इथे नकोच असा सूर स्टॉलधारकांनी 'दैनिक सकाळ'कडे व्यक्त केला आहे.

व्यवसायावर परिणाम होणार-

रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर खाद्यपदार्थ स्टॉल सुरु झाल्यावर प्रवाशांना खाद्यपदार्थ घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तुडवत जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परंतु, खाद्यपदार्थ स्टॉलधारकांचा व्यवसाय कमी होण्याची भीती सुद्धा खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी सकाळकडे व्यक्त केली आहे. तसेच मध्य रेल्वेने प्लँटफॉर्म क्रमांक आठवर खाद्यपदार्थ स्टॉल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी केली आहे.

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai Local News: एसी लोकल सुसाट, एका दिवसात तब्बल इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास

काय म्हणणे रेल्वे ?

प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जास्तीत जास्त जागा त्यांना वापरता यावी याकरिता प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी असणाऱ्या सर्व स्टॉलना दुसऱ्या जागी शिफ्ट करण्यासाठी वारंवार नोटीस दिली गेली होती. यासाठी त्यांना रेल्वेकडून वेगळी जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रेल्वे प्रयत्नशील होती. मात्र आता सर्व स्टॉलधारकांच्या सहकार्याने या कामाला पूर्णत्वास नेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सकाळाला दिली.

Mumbai Local News: दादर स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल बंद, प्रवासी हैराण!
Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.