Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारपासून दोनदिवस मध्यरात्रीनंतर १२:३० ते पहाटे ०४:३० वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.
या कालावधीमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंटचे (ओएचई) काम करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कालावधीत सीएसटीवरून मध्य रेल्वेवर रात्री १२.१४ वाजता, तर हार्बर मार्गावर रात्री १२.१३ वाजता शेवटची लोकल सुटणार आहे.
भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच वडाळा रोड ते सीएसएमटी रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर चार तासांचे दोन स्वतंत्र विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. या काळात शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्रीनंतर १२:३० ते पहाटे ०४:३० वाजेपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
यात १२८७० हावडा-सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, २२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस, ११०५८ अमृतसर- सीएसएमटी एक्स्प्रेस, ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस आणि १२८१० हावडा- सीएसएमटी मेलसाठी दादर स्थानकावर शेवटचा थांबा असणार आहे. ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
- शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवारी मुख्य मार्गावर ब्लॉकपूर्वी सीएसएमटीवरून डाऊन धीमी मार्गावरील शेवटची कसारा लोकल १२.१४ वाजता, तर कल्याण येथून शेवटची सीएसएमटी लोकल रात्री १०:३४ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून कर्जतसाठी पहाटे ४:४७ वाजता सुटेल, तर ठाणे येथून सीएसएमटी लोकल पहाटे ४ वाजता सुटेल.
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२:१३ ची पनवेलकरिता सुटेल, तर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून रात्री १०:४६ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४:५२ वाजता सुटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.