Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता

Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता
mumbai local news mega blocksakal
Updated on

Mumbai Local News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून आजपासून (ता. १७) ते १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी-विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल केला आहे. आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून १४ मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.

Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता
Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ वर २४ डब्याच्या मेल-एक्सप्रेस उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. आता अभियांत्रिकी-विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यासाठी १७ मे ते १ जूनदरम्यान दररोज रात्री सहा तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा अप धीम्या, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १०-१८ दरम्यान सर्व मार्गिकेवर असणार आहे. रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यत हा ब्लॉक असणार आहे. यादरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत.

Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता
Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास ठप्प; प्रवाशांचा खोळंबा, ठाणे स्थानकात झाला होता बिघाड

१२.१४ ची शेवटची लोकल


१७ ते २० मेदरम्यान लोकल-मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील ब्लॉकचा परिणाम होणार आहे. यामध्ये सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ वाजताची कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कल्याणहून रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. तर सीएसएमटीहून पहाटे ४.४७ वाजता कर्जत ही पहिली लोकल असणार आहे. ठाण्याहून पहाटे चार वाजताची सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे. ब्लॉकवेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.



दादर स्थानकात अंशत: रद्द मेल-एक्स्प्रेस


ट्रेन क्रमांक १२५३३ लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी, ट्रेन क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १११४० होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक २२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहे.

Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता
Mumbai Local News: तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस


ट्रेन क्रमांक २२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, ट्रेन क्रमांक ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस, २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दादरहून सुटणार आहेत.


पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना


ट्रेन क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि ट्रेन क्रमांक १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.

Mumbai Local News: आजपासून पंधरा दिवस विशेष ब्लॉक; शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता
Mumbai Local News: तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.