Mumbai Local News: मध्य रेल्वेवरील 'रेस्टारंट ऑन व्ही'ला प्रवाशांच्या मिळणार तुफान प्रतिसादानंतर आता मध्य रेल्वे डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर 'रेस्टारंट ऑन व्ही' सुरु करण्यात येणार आहे. यांसंदर्भात येत्या- दोन तीन दिवसांत निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'दैनिक सकाळ'ला दिली आहे.
सर्व प्रथम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १८ ऑक्टोबर २०२१ पासून सीएसएमटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केले होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले होते.
ज्याला बोगी-वोगी असे नाव मध्य रेल्वेकडून देण्यात आले. या रेस्टॉरंट ऑन व्हील्समध्ये ४० जणांना बसण्याची साेय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतात. सीएसएमटीवरील 'रेस्टाॅरंट ऑन व्ही' सुरु झाल्यापासून हजारो प्रवाशांनी 'रेस्टाॅरंट ऑन व्ही'मधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे.
आता सीएसएमटीच्या पुनर्विकासामुळे कामामुळे बंद आहे. परंतु, सीएसएमटीच्या 'रेस्टारंट ऑन व्ही'ला प्रवाशांच्या मिळणार तुफान प्रतिसादानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु करण्यात आले आहे.
तर, दादर रेल्वे स्थानकावर रेस्टॉरंट ऑन व्हील्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आता त्याच पाठोपाठ डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर 'रेस्टारंट ऑन व्ही' सुरु करण्याच्या निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यांसंदर्भात येत्या- दोन तीन दिवसांत निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'दैनिक सकाळ'ला दिली आहे.
या रेस्टॉरंट ऑन व्हील्समध्ये १० टेबलसह ४० जणांना बसण्याची साेय होती. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतात. विशेष म्हणजे येथील खाद्यपदार्थाचे दर सर्वसामान्य प्रवाशांना पुरवेल इतके होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये अत्यंत कमी कालावधीत रेस्टॉरंट ऑन व्हील्स लोकप्रिय झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.