Mumbai News: सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉकची घोषणा केलेली असतानाच मध्य रेल्वेने बुधवारी आणखी ठाणे स्थानक येथे ६३ तासांच्या ब्लॉकची घोषणा केली आहे. या दोन्ही ब्लॉकमुळे ९३० लोकल फेऱ्या तर ७२ मेल गाड्या रद्द असणार आहे. याशिवाय अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. हा ब्लॉक येत्या १ आणि २ जून २०२४ रोजी असणार आहे.
तर, ठाणे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदी करण्यासाठी शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत असे ६३ तासांचा ब्लॉकची मध्य रेल्वेने घोषणा केली आहे. या दोन्हो ब्लॉकमुळे रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांना केले आहे.
पहिला ब्लॉक -
स्थानक - ठाणे ते कळवा
मार्ग - डाऊन जलद, डाऊन जलद आणि अप धीमी
वेळ- शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत
एकूण ब्लॉक कालावधी - एकूण ६३ तास
------
स्थानक - सीएसएमटी ते भायखळा
मार्ग- अप- डाऊन धीमा, अप-डाउन जलद,
स्थानक - सीएसएमटी ते वडाळा
वेळ- शनिवारी १ जून च्या रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी १२.३० वाजेपर्यंत
एकूण ब्लॉक कालावधी - एकूण ३६ तास
---------------
दिवस - लोकल रद्द- शॉर्ट टर्मिनेट
शुक्रवारी - १६१ -०७
शनिवारी - ५३४ - ३०६
रविवारी - २३५- १३१
---------------------
एकूण -९३०- ४४४
मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द
शुक्रवारी - ०४
शनिवारी - ३७
रविवारी - ३१
----------
एकूण =७२
-------------
मेल- एक्सप्रेस रद्द -
३६ तासांच्या ब्लॉकमध्ये सीएसएमटीकडे जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस रेल्वेगाड्या दादरमध्ये २२ ठाण्यात २, पनवेल ३ , पुणे ५ आणि नाशिकमध्ये १ शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याच वेळेत सीएसएमटी ऐवजी दादरवरून २० मेल-एक्स्प्रेस, पनवेलहून ३, पुण्यातून ५ आणि नाशिकहून १ गाडी सोडण्यात येणार आहे.
---------
शनिवारी मध्य रात्री १२.३० ते २ जून रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वडाळा ते सीएसएमटी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी डाउन जलद मार्गावर ६३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद लोकल, मेल-एक्स्प्रेस पर्यायी मार्गावर चालवण्यात येणार आहे. रविवारी आणि शनिवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असेल तरच लोकल प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
-------
ठाणे आणि सीएसएमटीच्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी आणि बेस्ट उपक्रमाने ज्यादा बसेस चालविण्याची विनंती मध्य रेल्वेने प्रशासाने केली आहे.
--------
शनिवारी आणि रविवारी लोकल फेऱ्या रद्द असल्याने प्रवाशांची रेल्वे स्थानकात गर्दी लक्षात घेतात मध्य रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकात ज्यादा आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि एमएसएफचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहे. तसेच स्थानकाबाहेर आणि स्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी टीसींची तैनात करण्या येणार आहे. '
ब्लॉक कालावधीत रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी शासकीय व खासगी आस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्यावीत. तसेच नागरिकांनी गरज असेल तर रेल्वे प्रवास करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.