Railway News: रेल्वे गाड्या ११० ते १३० किमी ताशी वेगाने धावण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण (सेफ्टी फेसिंग )उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
१२८२ पैकी ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचा वेगही वाढणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने सकाळला दिली आहे.
रेल्वे रुळांवर गुरे आल्याने अपघात झाल्यास त्याचा तर जीव जातोच. त्यासोबतच हजारो रेल्वे प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक रेल्वे रुळावर गुरे आल्याने अनेक अपघात घडले आहे. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापासून वंदे भारत ट्रेनला गुरे धडकण्याचा घटना घडल्या आहे.
त्यामुळे गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेग वाढविण्याकरिता आता मध्य रेल्वेने ४ हजार २२६ किलोमीटर रेल्वे मार्गवर सुरक्षा कुंपण (सेफ्टी फेसिंग) उभारण्याचे काम हाती घेतली आहे. आतापर्यत २०५० किलोमीटर सुरक्षा कुंपण उभारण्यात आले आहे. आता १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. याकरिता ६२४ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई उपनगरत रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. याकरिता साधारण २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा भिंत बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.
रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झालेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा कुपन बांधून शून्य अपघाताचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.
- मरेवर १२८२ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण
- मुंबईत ४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण
- सुरक्षा कुंपण उभारण्यासाठी ६२४ कोटींचा खर्च
- एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन
- मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार
- रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांना आळा बसणार
- रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबणार
- रेल्वे रुळावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.