Mumbai Local: मुंबई लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय!

Mumbai Local
Mumbai Local sakal
Updated on

Mumbai Local: उपनगरीय लोकल ट्रेनच्या पिक आवर्समधली गर्दीचा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे. मुख्यालयातील कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ बदलल्यानंतर आता मुंबई परिसरातील रेल्वेची कारशेड आणि स्थानकात कार्यरत असलेल्य कर्मचार्‍यांनाही वेळात बदल करण्याचा मध्य रेल्वेकडून निर्णय घेतला घेतला आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकल गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

Mumbai Local
Mumbai Local: २.९४ हजार पर्यटकांनी केला लोकल प्रवास; रेल्वेची पर्यटन तिकीट सुसाट !

उपनगरीय लोकल ट्रेनच्या पिक आवर्सममध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दीमुळे अपघात घडत आहे. हे अपघात कमी करण्यासाठी आणि लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी शासकीय आणि खासगी कार्यलयाचे कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवहान मध्य रेल्वेने केले आहे, याची सुरुवात या १ नोव्हेंबर २०२३ पासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या मुख्यालयातील कार्यालयीन वेळामध्ये बदल करून केली आहे.

रेल्वे मुख्यालयातील कर्मचार्‍यांनाही सदरचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर १५०० पेैकी ४०० कर्मचारी सकाळी साडेनऊ ऐवजी अकराच्या वेळेला कार्यालयात येत आहेत. रेल्वेने आता मुख्यालयासोबतच कारशेड आणि रेल्वे स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना हा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सुचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहे.

Mumbai Local
Mumbai Local: लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीला १ दिवसाची शिक्षा

मुंबई विभागात सुमारे ३० हजार कर्मचारी कार्यरत असल्याने त्यापैकी २०-२५ टक्के कर्मचार्‍यांनी हा पर्याय निवडल्यास लोकलची गर्दी काहीशी कमी होऊ शकणार आहे.

मध्य रेल्वेने मुंबईतील खासगी आणि शासकीय कार्यलयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयांनी वेळेत बदल करण्याचे आवाहन केले होते. तसेच यांसंदर्भात मुबईतील सरकारी कार्यालये, बँका, रूग्णालये, शाळा, खासगी कार्यालयाला मध्य रेल्वेकडून विनंती पत्र पाठविण्यात येत आहे. आतापर्यत ५०० पेक्षा जास्त विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. यातून अनेक संस्थांनी कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai Local
Mumbai Local: एसी लोकलमधील फुकट्यांविरोधात प्रशासन आक्रमक; ११५ कोटींचा दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.