Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा सिग्नल बिघाड, मुंबईकरांचे प्रचंड हाल

Central Railway: लोकल विलंबाने मुंबईकरांना दुहेरी मनस्ताप
Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा सिग्नल बिघाड, मुंबईकरांचे प्रचंड हाल
Mumbai Localsakal
Updated on

Local Train Signal Problem: मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाडामुळे गुरुवारी (ता.१३) ऐन सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे अप जलद लोकल सेवा खोळंबल्या होत्या. या घटनेमुळे सीएसएमटीकडून जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.(Vikroli Railway Station)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. हा सिग्नल बिघाड पाचव्या सहाव्या मार्गिकेवर झाल्याने मेल- एक्सप्रेस गाड्या जागीच खोळंबल्या. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेकडील वाहतूक बंद पडली.

Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा सिग्नल बिघाड, मुंबईकरांचे प्रचंड हाल
Mumbai Local Update : डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

या बिघाडामुळे मध्य रेल्वेने मेल- एक्सप्रेस गाड्या चौथ्या आणि तिसऱ्या मार्गिकेवरून वळविण्यात आलेल्या होत्या.परिणामी जलद मार्गावरील लोकल सेवाच्या वेळापत्रकावर परिणाम दिसून आला. सकाळी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

याघटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन बिघाड दुरुस्त केला आहे. मात्र, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेला पाऊण तास लागल्याने उपनगरीय लोकल सेवांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम पडला होता. हा बिघाड सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी दुरुस्त करण्यात आला आहे.

मुंबईकरांना दुहेरी मनस्ताप -

सीएसएमटी स्थानकात ब्लॉक दरम्यान नविन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. मात्र, दहा दिवस होऊन सुद्धा ही यंत्रणा स्थिर झालेली नाही. त्यामुळे भायखळा ते सीएसएमटी अप मार्गावरील जलद आणि धीम्या लोकल उशिराने धावत आहे.

त्यामुळे मुंबईकरांना अगोदरच विलंबाचा फटका बसत आहे. त्यातच वारंवार सिंग्नल बिघाडाचा घटनेमुळे मुंबईकर दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी विक्रोळी स्थानकात झालेल्या सिग्नल बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क बसला आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेवर पुन्हा सिग्नल बिघाड, मुंबईकरांचे प्रचंड हाल
Mumbai Local Update : डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.