Mumbai Railway: पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण, दहा तासांचा मेगाब्लॉक संपला; लोकल गाड्यांची संख्या वाढणार

Mumbai News: या ब्लॉकच्या कालावधीत इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यात आले.
Mumbai Railway
Mumbai News
Updated on

Latest mumbai Local News: पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेला शेवटचा १० तासांचा ब्लॉक संपला आहे.

त्यामुळे लवकरच कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे गाड्यांची संख्या वाढून पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकलच्या वक्तशीरपणात आणखी सुधारणा होणार आहे.

Mumbai Railway
Mumbai Local: नवीन वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

कांदिवली-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका उभारण्यासाठी ४० दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रात्रकालीन मेगाब्लॉक घेऊन हे काम टप्प्या-टप्प्याने सुरू होते. २७ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील ब्लॉकचा शेवटचा टप्पा रविवारी सकाळी पार पडला. या ब्लॉकच्या कालावधीत इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यात आले.

Mumbai Railway
Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

लवकरच होणार मार्गिकेची चाचणी !

कांदिवलीपर्यंत पूर्ण झालेल्या सहाव्‍या मार्गिकेवर लवकरच चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा सुरक्षा अहवाल मिळाल्यावर नवीन मार्गवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सध्या कांदिवली ते बोरिवलीदरम्यान या मार्गिका उभारण्यापूर्वीची कामे सुरू आहेत. हे कामही दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे पश्‍चिम रेल्वेचे नियोजन आहे.

Mumbai Railway
Mumbai Local Train Mega Block: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.