Mumbai Local Train : लोकलमधून 700 प्रवाशांचा मृत्यू! रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात खुलासा

Mumbai Local Train
Mumbai Local Train
Updated on

मुंबई :लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करु नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सुचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतात. गेल्या वर्षी ७०० जणांचा लोकलमधून खाली पडल्याने मृत्यु तर एक हजारपेक्षा जास्त प्रवासी जखली झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात समोर आली आहे.

त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर बंद दरवाज्याचा लोकल असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये अग्निरोधक यंत्र असणे आवश्यक असल्याचे मत रेल्वे सुरक्षा आयोगाच्या २०२१-२२च्या अहवालात नमूद केले आहे.

Mumbai Local Train
Shivsena vardhapan din 2023 : फडणवीस म्हणजे, हास्यजत्रेचा प्रयोग! मोदींनी लस तयार केल्याच्या दाव्याची ठाकरेंनी उवडली खिल्ली

भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमधील होणारे मेल-एक्सप्रेस,मालगाड्यांचे अपघात, प्रवासी सुविधा,उपाययोजना संदर्भात दरवर्षी रेल्वे सुरक्षा आयोगा आपला अहवाल प्रसिद्ध करते. यंदा सुद्धा २०२१-२२चा अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये रेल्वे सुरक्षा आयोगाने उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यु आणि लोकलमध्ये उपलब्ध नसलेल्या अग्निशमन यंत्रणे बाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरुन २०२२ मध्ये धावत्या लोकलमधून गर्दीमुळे एक हजार ७०० अपघात झाले. त्यात ७०० प्रवाशांचा मृत्यु झाला तर एक हजार प्रवासी जखमी झाले. वाढते अपघात हे गंभीर बाब असल्याने उपनगरीय रेल्वे मार्गावर बंद दरवाज्याच्या लोकल असणे आवश्यक असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

Mumbai Local Train
Uddhav Thackeray : 'हेच आपलं शेवटचं आव्हान', उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलं थेट चॅलेंज

व्यक्त केली चिंता

मध्य आणि पश्चिम रेल्वे ३ हजार पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होत्या. यामधून ७५ लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकल सेवेत अग्निरोधक यंत्र उपलब्ध नसल्याने रेल्वे सुरक्षा आयोगाने चितां व्यक्त केली आहे. सध्या अग्निरोधक यंत्र हे फक्त मोटरमन आणि गार्डच्या केबिनमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे लोकलमध्ये आगीची घटना घडल्यास अग्निविरोधक यंत्र उपलब्ध नसल्याने मोठी जीवीतहानी होऊ शकते.

४५ हजार ५४५ अग्निशमन यंत्र

लोकलमध्ये आगीची दुर्घटना झाल्यास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेने प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये अग्निरोधक यंत्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी ४५ हजार ५४५ अग्निशमन यंत्र लोकलच्या प्रत्येक डब्यात लावण्यात यावे अशी शिफारस या अहवालात केली आहे. याशिवाय लोकलमध्ये अॅटोमॅटीक फायर सुपर सेशन सिस्टिम लावण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.