Mumbai Local Train Mega Block: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

Sunday Mega Block News: मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आला आहे.
Mega Block News
Mega Block News
Updated on

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिककामांसाठी रविवारी (ता. २९) मध्य रेल्वे तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे

कुठे- माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडपुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Mega Block News
Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांना आता लोकलमध्ये धक्के खात प्रवास करण्याची गरज नाही; कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

हार्बर रेल्वे

कुठे- कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून वाशी/ बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे ते वाशी - नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करू शकतात.

Mega Block News
Mumbai Local News: मोठी बातमी, येत्या १५ महीन्यात घावणार पनवेल-कर्जत लोकल!

हार्बरवर ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी रविवारी- सोमवारी रात्री दहा तासांचा ट्रैफिक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अंधेरी ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरी सेवा रद्द असणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. २९) रात्री १२.३० ते सोमवारी सकाळी १०.३० पर्यंत १० तासांचा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत अंधेरी ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी रविवारी रात्री दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल सेवा रद्द, तर काही अंशतः रद्द असणार आहेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९) रात्री १२ वाजल्यापसून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.