धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, लोकलमधून ढकलून देण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत

धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, लोकलमधून ढकलून देण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत
Updated on

मुंबईः लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल या लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग करुन धावत्या लोकलमधून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं ढकलून देण्याचा प्रयत्न या आरोपीनं केला होता. या आरोपीला गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीतीने सोमवारी अटक केली आहे. पीडित महिला रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजले.

एक महिला प्रवासी 1 जानेवारी 2021 ला सकाळी 10.43 वाजताच्या दरम्यान वडाळा ते पनवेल असा महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होती. यावेळी आरोपी राजु बंडया पांडे उर्फ मुरगडी (वय 30) नवी मुंबई कोपरखैराणे येथे राहणारा आहे. हा वडाळा रेल्वे स्टेशन येथून लोकल सुटल्यानंतर महिलांच्या राखीव डब्यात चढला आणि महिलांना लोकल डब्यात एकटे पाहून अश्लील वर्तन करत त्या महिलेचा विनयभंग केला. यास महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने महिलेला वडाळा ते जीटीबी रेल्वे स्टेशनदरम्यान जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. 

याबाबत वडाळा रेल्वे पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार सदर गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई करीत होते.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा शैलेंद्र धिवार यांनी तपासपथक तयार करुन नमूद गुन्हयाचा तपास सुरु केला. 

स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्यानं आरोपीला पकडणे कठीण झाले होते. मात्र तपास पथकातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुप्त बातमीदारांच्या मदतीनं माहिती घेऊन तसेच हार्बर रेल्वे मार्गावर सापळ्याचे आयोजन करून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केला.

गुन्ह्यातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाशी मिळता जुळता एक व्यक्ती कोपरखैरणे येथे शहर हद्दीत राहावयास असून एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई रविंद्र सेनगांवकर, पोलिस उप-आयुक्त, एम.एम.मकानदार, सहा.पोलिस आयुक्त, राजेंद्र पाटील, गुन्हे, लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमराज साठे आणि स्टाफ यांनी विशेष मेहनत घेत आरोपीस अटक केले आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai local train misbehave with ladies accused arrested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.