मुंबई : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मुंबई लोकलने प्रवास करता येईल अशी चिन्ह दिसतायत. कारण लवकरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु होतील असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्यासोबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊनपासून बंद असलेली लोकल आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होऊ शकते असे स्पष्ट संकेत दिले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सचे अधिकारी यांच्याकडून मुंबईतील लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यासाठी आढावा घेतला जातोय. मुख्यमंत्री, मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून याबाबतची पूर्वतयारी पूर्ण केल्याचं बोललं जातंय. दरम्यान याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना माहिती दिली आणि लवकरच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु केली जाऊ शकते. अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाऊ शकतो, असं सांगितलं.
किशोरी पेडणेकर म्हणाल्यात...
मला वाटतं की २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी पासून बहुदा मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल ट्रेन्स सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होण्याचे चान्सेस आहेत. त्याबाबत अंतिम निर्णय येईल. मात्र जरी ट्रेन सुरु झाल्यात तरी सर्वसामान्यांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरावं असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
mumbai local train news mayor kishori pednekar says trains might start for all from 1st february
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.