Mumbai Local Train : उरणविसायांना मिळणार दिलासा ; लोकल सुरु करण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी, लोकलच्या ४० होणार फेऱ्या

खारकोपर- उरण नवीन रेल्वे मार्गिकेवर लोकल सेवा सुरु करण्याची अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी
mumbai local train news railway board approval to start local in kharkopar uran 40 rounds of local
mumbai local train news railway board approval to start local in kharkopar uran 40 rounds of localesakal
Updated on

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या खारकोपर- उरण नवीन रेल्वे मार्गिकेवर लोकल सेवा सुरु करण्याची अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र या मार्गिकेला देण्यात आले आहे. तसेच सुरुवातील या नव्या मार्गिकेवर ४० लोकल फेऱ्या चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या बेलापूर-खारकोपर रेल्वे मार्गाचे नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्घाटन करत लोकल सेवा सुरू केली होती. या मार्गावर सध्या बेलापूर-खारकोपर दरम्यान २० तर नेरूळ-खारकोपर दरम्यान २० अशा एकूण ४० लोकल गाड्या चालवल्या जात आहे.

हाच मार्ग पुढे उरणपर्यंत जात असून रेल्वेने १४.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गिकेच काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके बांधून पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाला दीड हजार कोटी रूपयांहून अधिक खर्च आला आहे. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गिकेची पाहणी काही महिन्यापूर्वी केली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी संपूर्ण अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. त्यानंतर आता खारकोपर- उरण नवीन रेल्वे मार्गिकेवर लोकल सेवा सुरु करण्याची अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.

नेरूळ ,बेलापूर ते खारकोपरपर्यंत दिवसाला सध्या ४० लोकल फेऱ्या सुरू आहेत. यातील काही लोकल उरण पर्यंत चालवण्यात येतील. तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील. यामुळे नवी मुंबई विमानतळ, उरण या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लवकरच होणार उदघाटन

विशेष म्हणजे, नवीन मुंबई येथील मेट्रोसह अन्य विकास कामाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. त्यासाठी सर्व तयारी सुद्धा सुरु झालेली आहे. मात्र, अचानक उदघाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने खारकोपर- उरण नवीन रेल्वे मार्गिकेवर सुरु होऊ शकली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत हा प्रकल्पाचे उदघाटन तारखेची घोषणा होण्याची शक्यात रेल्वे बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी खासगीत बोलताना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.