Mumbai local train passes : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून ऑफलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईसह महामुंबईतील 109 रेल्वेस्थानकांवर ३५८ लस प्रमाणपत्र पडताळणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मुंबई पालिका हद्दीतील 53 स्थानकांवर पास मिळतील. प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर रेल्वेचा फक्त पास मिळणार आहे. अशा प्रवाशांना दैनंदिन तिकीट काढता येणार नाही.
कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांनाच लोकल प्रवासासाठी स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. मात्र, ॲपसाठी काही कालावधी लागणार असल्याने रेल्वेस्थानकांवर ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महामुंबईतील 109 रेल्वेस्थानकांवर महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाचे मदत कक्ष सुरू करण्यात आलेत. सध्या दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. दैनंदिन तिकीट देण्यात येणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पास मिळण्याचे काम सुरु होणार आहे.
पाससाठी नागरिकांना दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत कक्षात सादर करावी लागेल. कोविड लस न घेतलेल्या किंवा एकच डोस घेतलेल्या नागरिकांनी गर्दी करू नये. जवळच्या रेल्वेस्थानकावर जाऊन पासची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी अधिकान्याची नियुक्ती केल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
अशी आहे प्रक्रिया
दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत कक्षात सादर करावी
दुसऱ्या डोसच्या प्रमाणपत्राची कोविन ॲपवर वैधता तपासल्यावर प्रमाणपत्राच्या आणि ओळखपत्राच्या प्रतीवर शिक्का मारण्यात येईल
शिक्का मारलेले प्रमाणपत्र दाखवून रेल्वेचा पास काढता येणार आहे
प्रमाणपत्र १५ ऑगस्टपासून वैध राहणार आहे
असे चालेल कक्षाचे काम
१०९ केंद्रांवर ३५८ कक्ष असतील
सकाळी ७ ते दुपारी ३
दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान काम सुरू राहील
...तर हातात बेड्या
लस प्रमाणपत्राची वैधता तपासूनच शिक्का मारण्यात येणार आहे. लशीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळल्यास साथ नियंत्रण कायदा, आपत्कालीन नियंत्रण कायदा तसेच भारतीय दंडसंहितेनुसार फौजदारी कारवाई होईल, असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले. तुरुंगवास तसेच दंड अशा कारवाईची तरतूद त्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.