Mumbai Local Train: बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे सेवा खोळंबली; एक तासापासून वाहतूक बंद

Mumbai Local Train Railway News: तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याचं समजत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराला लागत आहे.
Mumbai Local  train news
Mumbai Local train news
Updated on

मुंबई- अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक बंद आहे. जवळपास एक तासांपासून बदलापूर, कर्जतकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याचं समजत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराला लागत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळी साडेदहा वाजल्यापासून एकही रेल्वे सुटलेली नाही. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे. प्रवाशांनी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. कर्मचारी वर्गाचे यामुळे हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे ठप्प झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रेल्वे कधी कार्यरत होईल याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com