'मुंबई लोकल'बद्दल ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे सूचक वक्तव्य

'मुंबई लोकल'बद्दल ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे सूचक वक्तव्य राज्यात कालच लॉकडाउनचे नवे निर्बंध जाहीर झालेॉ Mumbai Local Trains Nawab Malik says Restrictions cant be eased as third wave is near vjb 91
Mumbai-Local
Mumbai-Local
Updated on

राज्यात कालच लॉकडाउनचे नवे निर्बंध जाहीर झाले

मुंबई: राज्यातील कोविड संसर्ग (Covid 19 in Maharashtra) मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे (3rd Level Lockdown Restrictions) निर्बंध कायम ठेवण्यात आले. मुंबई (Mumbai) , मुंबई उपनगर (Suburban) आणि ठाणे (Thane) या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Disaster Management Authority) निर्बंधांबाबत ठरविणार आहे. मुंबई लोकलचं जाळं हे मुंबई, उपनगर, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे लोकल ट्रेनबद्दल नक्की काय निर्णय घेतला जाणार किंवा सर्वसामान्य नागरिकांना परवानगी मिळणार का याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. लोकलमधून प्रवास करायला देण्याची मोठी मागणी आहे, पण सध्या तरी सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलप्रवासासाठी वाट पाहावी लागणार असल्याचं चित्र आहे.

Mumbai-Local
लॉकडाउनचे नवे नियम जाहीर! मुंबई लोकलचं काय... वाचा सविस्तर

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई लोकलबाबत वक्तव्य करताना, 'मुख्यमंत्र्यांनी लोकलला नाही म्हटलेलं नाही', असं विधान केलं. त्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनीही लोकल प्रवासाबाबत काहीसे नकारात्मक संकेत दिले. "सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद आहेत. अद्याप सामान्यांसाठीच्या लोकल प्रवासासाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जगातील विविध भागात आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. ही लाट आधीपेक्षा मोठी येणार आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे निर्बंध कायम ठेवणं अतिशय गरजेचं आहे", असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, "काही लोक आंदोलन करू पाहत आहेत. पण असं आंदोलन करून ते त्यांच्याच म्हणजे मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध करताना दिसत आहेत", अशी टीका मलिक यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर केली.

Nawab-Malik-NCP
Nawab-Malik-NCP
Mumbai-Local
राज्य सरकार सामान्यांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवणार कधी ?

लोकल आणि नवीन नियमावली

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांतील निर्बंध कसे असावेत हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठरवतील असं सांगण्यात आलं आहे. तर, पालघर आणि रायगड हे दोन जिल्हे अद्यापही तिसऱ्या स्तराच्या लॉकडाउनमध्येच आहेत. खरे पाहता मुंबई लोकलचं जाळं हे मुंबई, उपनगर, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे लोकल ट्रेनबद्दल नक्की काय निर्णय घेणार याचा पेच आपत्ती व्यवस्थापन विभागापुढे असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने विचार केल्यास तिसऱ्या लाटेचा धोका अधिक आहे. तर दुसरीकडे ट्रेन बंद ठेवल्याने सर्वसामान्य मुंबईकर ठाकरे सरकारवर कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे नक्की काय निर्णय घ्यावा, अशा कोंडीत ठाकरे सरकार सापडल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.