राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असतानाच आता राज्य सरकारने (State Govt) परिस्थिती पाहून ३०० जूनपर्यंत चार टप्प्यात (Four Steps) सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे काही निर्बंध (Restrictions) कायम राहतील. पहिल्या टप्प्यात दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत केली जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Mumbai Local Trains will be closed till 15 June some restrictions loosen up)
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांपर्यंत कमी झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड शिल्लक असून ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन शिथिलतेबाबत जपून पाऊल टाकत आहे. एकाचवेळी नागरिकांची मोठी गर्दी होईल, अशा आस्थापनांना ३० जूनपर्यंत सवलती दिल्या जाणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले असून त्यांना सवलती दिल्या जातील.
दरम्यान, आगामी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे सरकारने पूर्वतयारीसाठी एक हजार कोटींचा निधी दिला आहे. तसेच ४० हजार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि रेमडेसिवीरच्या खरेदीसाठीही निधी राखून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
पहिला टप्पा- दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वाढविणे.
दुसरा टप्पा- लोकांच्या दररोजच्या जीवनाशी निगडीत आणखी काही दुकानांना
परवानगी.
तिसरा टप्पा- हॉटेल, परमिट रूम, बिअरबार, मद्यविक्री दुकाने निर्बंधासह सुरू
चौथा टप्पा- मुंबई लोकल, मंदिरांसह धार्मिक स्थळे, जिल्हाबंदीला स्थगिती
लॉकडाऊन उठविण्याची मंत्र्यांची घाई ?
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अजूनही अपेक्षित यश मिळाले नसून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. सध्या नागपूर, नाशिक, नगर, बीड, अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे अशा १५ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिलेची घाई न करता टप्प्याटप्याने निर्णय घ्यावेत, असे आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, नागरिकांसह उद्योजकांचा रोष आणखी वाढू नये म्हणून तिन्ही पक्षातील मंत्री लॉकडाऊन उठविण्याची घाई करीत असल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.