वसई तालुक्यातून जाणाऱ्या पश्चिम रेल्वेतर्फे विरार आणि बोरीवली दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेलाठी नव्याने सर्वेक्षण करण्यास सुरवात करण्यात आली आहे. रविवारपर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यापूर्वी करण्यात आलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यामुळे हे नव्याने सर्वेक्षण करण्यात येत असून त्यानुसार महिन्याभरात नव्याने भूसंपादानाची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे. या बाबत सर्वात अगोदर सकाळने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती.
विरार बोरिवली दरम्यान वाढती प्रवाशांची गर्दी, त्यामुळे होणारे अपघात याशिवाय नागरिकांना सुरळीत सुविधा मिळावी यासाठी बोरीवली आणि विरार दरम्यान नवीन मार्गिका टाकण्यात येणार आहे. वसई विरार व नालासोपारा या भागात वाहिन्या टाकताना १६ हेक्टर जागेची गरज भासणार आहे. वसई ते नायगाव दरम्यान यार्ड तयार करण्यात येणार आहे.
त्याअंतर्गत पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवलीदरम्यान नव्याने ५ आणि ५ क्रमांची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रॅकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वसई पश्चिमेकडील ५ उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत. यासाठी रेल्वे ने स्थानिकांना विश्वासात न घेता सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.त्याविरोधात येथील नागरिकांनी याबाबतच्या चुका रेल्वेच्या निदर्शनास आणण दिल्या होत्या तसेच आंदोलनाचा इशारा हि दिला होता.
याची अखेर रेल्वेने दखल घेऊन नव्याने जागेचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. त्यानुसार आता नव्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बुधवार पासून सुरू झालेेले हे सर्वेक्षण रविवार पर्यंत चालणार आहे. एकाच भूमानक क्रमांकात अनेकांच्या जागा होत्या. त्यामुळे पूर्वीच्या सर्वेक्षणामुळे नागरिकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. त्यासाठी आता नव्याने हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे सहाय्यक अभियंता संजीव भारद्वाज यांनी सांगितले. यामुळे नेमकी कोणाची आणि किती जागा जाईल ते स्पष्ट होईल. महिन्याभरात सर्वेक्षणाच्या आधारानुसार भूसंपादनाची अधिसूचना नव्याने प्रसिध्द केली जाईल, असेही भारद्वाज यांनी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.