Mumbai Local : सीएसएमटी स्थानकात बसविण्यात आलेल्या आधुनिक नविन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या नियमामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून लोकल वाहतुकीचे पूर्णतः तीन तेरा वाजले होते. सदर यंत्रणेतील रुळांवरील क्रॉसओव्हरवरून नियम शिथीत करण्याची मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे केली होती.
त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून आता नव्या यंत्रणेत पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावणार असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकातून लांबपल्याच्या २४ डब्याचा मेल - एक्सप्रेस गाड्या चालविण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते ११ चे विस्तारीकरण केले आहे. त्याच बरोबर मेल- एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी, यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सीएसएमटीमध्ये लावली आहे.
परंतु ही यंत्रणा बसविल्यापासून म्हणजेच २ जून २०२४ पासून रोजच लोकलची वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहे. लोकलचे वेळापत्रक सुरळित सुरु ठेवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रोज काही लोकल रद्द करत असल्याने गाड्यांना गर्दी वाढते आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु होते. सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याल्या मेल-एक्सप्रेस धावतात. दिवसाला सुमारे १४०० लोकल आणि १०० पेक्षा जास्त मेल-एक्सप्रेस स्थानकातून ये-जा करतात. या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नसल्याने लोकलच्या वाहतूकीचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले आहे.
लोकलचे वेळापत्रक पाळण्यासाठी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाच्या सिग्नल अॅंड टेलिकॉम विभागाने परिपत्रकातील नियम शिथील करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने सोमवारी मध्य रेल्वेला पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्याची परवानगी दिली आहे.यामुळे आता लोकलचे वेळापत्रक सुरळित होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या सिग्नल अॅंड टेलिकॉम विभागाच्या परिपत्रकानुसार रुळांवरील क्रॉसओव्हरवरून एक गाडी २५० मीटर पुढे गेल्यानंतरच त्या रेल्वे रुळांवरुन दुसरी गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. त्यातच क्रॉसओव्हरवर निर्धारित केलेल्या १५ किमी प्रतितास वेग मर्यादेसह अंतर पार करण्यासाठी प्रत्येक मेल-एक्स्प्रेसला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागायचा.
त्याचा परिणाम लोकलच्या सेवेवर होत होता.सीएसएमटी - कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकलकरिता स्वतंत्र मार्गिका नाही. एकाच अप-डाउन जलद मार्गावरुन लोकल आणि मेल-एक्सप्रेसची वाहतूक होते. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या मेल-एक्सप्रेसची संख्या पाहता याचा थेट परिणाम लोकलच्या सेवेवर होतो. मात्र, आत रेल्वे बोर्डाने नियमात शिथिल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.