मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवीन रुग्णांचा आकडा समोर येतो. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. बाहेर फिरताना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा काही बेजबाबदार नागरिक मास्क घालत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. याच नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा दिवसात केवळ 88 नागरिकचं मास्क न घालता घराबाहेर पडलेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गेल्या सहा दिवसांत केवळ 88 जणांवर मास्क न घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेहमी जागरुक असलेल्या बीएमसीला रविवारी केवळ एकच मास्क न घातलेला व्यक्ती आढळला.

अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तोंडाला मास्क लावूनच बाहेर फिरणं प्रशासनानं अनिवार्य केलं आहे.

8 एप्रिलला मास्क घालणं अनिवार्य

मुंबई महापालिकेनं 8 एप्रिलला सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य करण्याचा आदेश दिला होता. तसंच या नियमाचं उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करुन अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेनं 9 एप्रिलपासून दंड वसूल करण्यास सुरुवात केली. पालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. यानुसार महापालिकेनं जून अखेरपर्यंत  दररोज सरासरी 25 जणांवर कारवाई केली आहे.

15 एप्रिल ते 29 जून पर्यंत, महापालिकेने 2,017 व्यक्तींकडून 19 लाख 75 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला. नोंदीनुसार, बीएमसीने 5,169 लोकांना मास्क न घालण्याविषयी इशारा देखील दिला. 9 एप्रिल ते 30 जून या कालावधीत महापालिकेनं 20 लाख 11 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. पोलिस आणि क्लीन अप मार्शल हे कारवाई करण्यास अधिकृत आहेत.

29 जून रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मास्क वापरण्या संदर्भात नवा आदेश जारी केला. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार, असा आदेशचं त्यांनी काढला. मात्र नवीन आदेश काढल्यानंतर कारवाईत कमालीची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात, मार्शलनी 602 लोकांना मास्क न घातल्याबद्दल चेतावणी (warned) दिली.

गेल्या सहा दिवसातील कारवाया

30 जून- 35
1 जुलै- 16
2 जुलै- 17
3 जुलै- 12
4 जुलै- 7
5 जुलै- 1


एकूण- 88

mumbai lockdown without masks bmc 88 booked last six days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.