Mumbai Loksabha: मुंबईतल्या त्या चार जागांबाबत नक्की काय निर्णय होणार? वाचा इनसाईड स्टोरी

तरी दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवारांची गुढी अजूनही उकललेली नाही. भाजपने मनसेला आघाडीत सहभागी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 bjp shivsena ncp
bjp shivsena ncp sakal
Updated on


Mumbai Loksabha: भाजप-शिवसेनेतील बेबनाव आणि नंतरची शिवसेनेतील फाटाफूट यामुळे राज्याचे शक्तिस्थान असलेल्या मुंबईबाबत सावधानतेने पावले उमटवत भाजपने दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित केले असले.

तरी दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवारांची गुढी अजूनही उकललेली नाही. भाजपने मनसेला आघाडीत सहभागी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 bjp shivsena ncp
Loksabha Election 2024 : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची लोकसभा निवडणूकीत एंट्री! कुठून केली उमेदवारी जाहीर माहितीये?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांनी यासंदर्भात विधाने केली आहेत. दरम्यान, महायुतीने दक्षिण मुंबईत धनुष्यबाण किंवा कमळावर मतदान करण्याचा सल्ला दिला होता. मनसेच्या एका सूत्राने यावर कसे प्रतिसाद द्यावे याचा विचार केला जात आहे.

शिर्डी किंवा रत्नागिरीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारीतून लढवण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात असले तरी, त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. येथे विजयी उमेदवार निवडणे ही आघाडीची मोठी जबाबदारी आहे.

 bjp shivsena ncp
Loksabha Election 2024 : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची लोकसभा निवडणूकीत एंट्री! कुठून केली उमेदवारी जाहीर माहितीये?

उत्तर-मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांच्या जागी आशीष शेलार यांना उमेदवारीत उतरविण्याचा विचार सुरू आहे. पीयूष गोयल सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना निवडून देण्याची काळजी घेताना, मिहीर कोटेचा यांचा नवीन चेहरा समोर आणण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांच्या शिंदे गटाकडील उमेदवारी वगळता, इतर काही अद्याप निश्चित नसल्याचे समजते.

 bjp shivsena ncp
BJP Loksabha Second List: भाजपचा गेम प्लॅन! राज्यात 4 खासदारांचा पत्ता कट; कुणाला मिळाली पहिल्यांदा संधी? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.