Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Muslim voters in Mumbai: मुंबईमध्ये व आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या मतदानाच्या टक्क्यावर सर्वच पक्षांचं लक्ष आहे
Mumbai Muslim
Mumbai Muslim
Updated on

Mumbai News: मुंबई सह संपूर्ण उपनगरामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. अशावेळी या मुस्लिम मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करत आहे. भाजप, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस हे चारही पक्ष आपल्या बाजूने कशाप्रकारे या मतांना वळवता येईल याकडे लक्ष देत आहेत. मुंबईमध्ये व आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या मतदानाच्या टक्क्यावर सर्वच पक्षांचं लक्ष आहे

याबाबत अधिक माहिती अशी , 2019 यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षांनी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाची मतं आपल्या बाजूला वळवली होती. याचा थेट फटका हा तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीला बसला होता. पर्यायी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून आल्या होत्या

Mumbai Muslim
लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

असे जरी असले तरी यंदा जरा चित्र बदलण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मुस्लिम मतं वळू शकतात असे म्हटले जात आहे. मुस्लीम समाजाकडून एमआयएम पक्षाला साथ मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी मुस्लीम मत थेट ठाकरे आणि काँग्रेसकडेच वळतील असे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी किंवा इतर वेळी नक्की काय होते हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे असणार आहे.

मुंबईतील बहुसंख्याक मुसलमान समाज हा झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. अशावेळी या ठिकाणी जाऊन समाजातील काही लोकांची चर्चा केली असता त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही असल्याचे म्हटले जात आहे. याचबरोबर ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला देखील विरोध मुस्लिम समाज करताना पाहीला मिळत आहे.

Mumbai Muslim
Nashik Lok Sabha Election : मद्य, पैसा, सोशल मीडियावर विशेष लक्ष; नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा

महागाईमुळे नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात मुस्लीम समाजामध्ये खदखद असून मतदानाच्या माध्यमातून मुस्लिम समाज एकवटला जाईल असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. निवडणुकीत कोणीही कितीही धर्माचा मुद्दा पुढे आणला तरी महागाईचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे या भागातील मुस्लिम मतदारांचे मत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.