Mumbai : रस्ते अपघातात महाराष्ट्र नियमीत सहाव्या क्रमांकावर; सहा वर्षांमध्ये क्रमांकात कोणताही बदल नाही

केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट
 road Accident
road Accident Sakal
Updated on

मुंबई - देशातील रस्ते अपघातामध्ये पहिल्या क्रमांकावर तामीळनाडू त्यानंतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि त्यानंतर सहावा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो आहे. २०१७ पासून अपघातातील हा क्रमांक सारखाच असून,

सर्वाच्च न्यायालयाने देशात रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन केल्यानंतरही या क्रमांकामध्ये काही फरक पडला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

खुद्द केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाच्या (माॅर्थ) अपघाताच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. समृद्धी महामार्गासह राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर अपघातांमूळे राज्यातील रस्ता सुरक्षा कक्षाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान २०१७ मध्ये देशात सर्वाच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली देशाची रस्ता सुरक्षा समिती तयार केली आहे. या समितीअंतर्गत सर्व राज्यांमध्ये रस्ता सुरक्षा कक्ष उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष काम करतो आहे. मात्र, त्यानंतरही देशपातळीवर अपघातांमध्ये लागणारा सहावा क्रमांक कमी करण्यात राज्याला यश आले नसल्याचे दिसून येत आहे. उलट गेल्या चार वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२ मध्ये सर्वाधीक ३३३८३ अपघात झाले असून, गेल्या दहावर्षाच्या तुलनेत सर्वाधीक १५२२४ मृत्यु गेल्यावर्षी झाले आहे.

 road Accident
Mumbai Local : पावसामुळे लोकलला लेटमार्क!

देशातील गेल्या पाच वर्षांतील अपघाताची आकडेवारी

राज्य - अपघात

तामीळनाडू - ५५६८२

मध्यप्रदेश - ४८८७७

उत्तरप्रदेश - ३७३२९

कर्नाटक - ३४६४७

केरळ - ३३२९६

महाराष्ट्र - २९४७७

२०२३ मध्ये पहिल्यांदा आपला अपघात आणि मृत्युच्या आकडेवारी मध्ये घट झाली आहे. सुमारे ७ महिन्यात सुमारे १० टक्के कमी असून, त्यावर आम्ही समाधानी नाही. बऱ्याच उपाययोजना आम्ही राबवल्या आहे. इंटरसेप्टर व्हेईकल यायला दोन महिने लागणार आहे. त्यामूळे हे वर्ष नियोजनातच जाणार आहे. त्यामूळे पुढच्या वर्षी ३० टक्के अपघात कमी करण्याचा विश्वास आहे.

विवेक भिमनवार, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

 road Accident
Mumbai News : अधिकृत इंटक संघटनेचा वाद औद्योगीक न्यायालयात; एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा रद्द

अशा कक्षांमुळे जगात कुठे काही बदल झाले नाही. यंत्रणा मुळापासून बदलने गरजेचे आहे. ज्याप्रमाणे वरून मलमपट्टी करून अर्थ नसतो, पोटातून औषध द्यावे लागते.त्याप्रमाणे, ड्रायव्हींग लायसंन्स, रस्तांवरीव रस्ता वाहतुक, ओव्हरलोडींग यासगळ्या गोष्टीवर काम करावे लागेल, जगात असे फरक पडले आहे. स्विडन, स्विझरलँड अशा ठिकाणी अपघात, मृत्यु कमी झाले. भारतात वाहन कमी मृत्युचे प्रमाण जास्त आहे. त्यामूळे जगाशी तुलना करायला पाहिजे, राज्या-राज्यात तुलना करून फायदा नाही.

महेश झगडे, माजी आयुक्त, राज्य परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.