मालाड दुर्घटना: चौकशी आयोगाच्या आयुक्तपदी जे पी देवधर

या प्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल Mumbai Malad Building Collapse J P Deodhar appointed as Commissioner of Inquiry Commission
Malvani Building collapsed
Malvani Building collapsed
Updated on

या प्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई: शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) १० जूनला मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवासी इमारत कोसळली (residential structure collapsed). या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची आणि केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या चौकशीसाठी एक आयोग तयार करण्यात आला आहे. या आयोगाच्या आयुक्तपदी निवृत्त न्यायमूर्ती जे पी देवधर यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने केली आहे. (Mumbai Malad Building Collapse J P Deodhar appointed as Commissioner of Commission of Inquiry)

Malvani Building collapsed
मुंबईत 733 नवे रूग्ण तर 732 जणांची कोरोनावर मात

मालाड येथील दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्युमोटो याचिकेत याची दखल घेतली. त्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. संबंधित इमारत अनधिकृत होती का? महापालिकेच्या वतीने इमारतीला किती वेळा नोटीस बजावली? इमारत मालकाने परवानगी कशी मिळवली? असे महत्त्वाचे प्रश्न कोर्टाने उपस्थित केल्यामुळे आयोगाकडून या मुद्द्यांवर चौकशी होऊ शकते. आयोगाला 24 जूनपर्यंत प्राथमिक अहवाल दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

Malvani Building collapsed
"औषधांवरीस GST कमी करून काही होणार नाही, त्यापेक्षा..."

दुर्घटना का घडली?

या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टी केल्याने ही बिल्डिंग कोसळली, अशी माहिती मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतीलही दोघांचा मृत्यू झाला. जी इमारत कोसळली, ते बांधकाम अनाधिकृत होतं. त्या बांधकामात काही स्ट्रक्चरल डीफॉल्ट्स (बांधकामातील त्रुटी) होत्या. तोक्तेचा तडाखा हा इमारतीला जेव्हा बसला तेव्हाच याची देखभाल दुरूस्ती केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असेही नांगरे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()