मुंबईत दिवाळी सणाची धामधूम सुरू असतानाच मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चंद्रेश तिवारी असे या तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या शेवटच्या व्हिडिओत तिघा व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांकडून विशेष चौकशी सुरू आहे.