मुंबई : मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह (Mumbai Corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. मात्र, अजूनही मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये (Mumbai Corona Patient) पुरुषांची (Male patient) संख्या अधिक आहे. कोरोना संसर्गाच्या (Corona infection) दुसऱ्या लाटेमध्ये लागण होण्याचे प्रमाण 31 ते 40 वयोगटामध्ये सर्वाधिक दिसून आले आहे. राज्यासह मुंबईमध्येही हेच चित्र दिसत आहे. (Mumbai Male candidates too much in corona cases says BMC-nss91)
मुंबई पालिकेच्या आकडेवारीनुसार, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. कोरोना संसर्गासाठी केलेल्या एकूण चाचण्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आढळले आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतही पुरुषांचे विशेषत: तरुण मंडळी जी कामानिमित्त घराबाहेर पडत होती. अशांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक होते. आता ही परिस्थिती सारखीच आहे. अनलॉकनंतर कामानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, कोरोना संसर्ग झालेल्या तरुण रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक दिसून येते. यातही सहआजार असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे, तसेच वैद्यकीय उपचारासाठी तरुण खूपच विलंबाने जात असल्याचे दिसून येत आहे.
काय सांगतात मुंबईतील आकडे?
मुंबईमध्ये 30 ते 39 या वयोगटातील 14 लाख 09 हजार 98 जणांना कोरोनासंसर्ग झाल्याचे दिसून येते. यात पुरुषांचे प्रमाण 63 टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण 37 टक्के नोंदवण्यात आले आहे. 50 ते 59 या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण 12 लाख 2 हजार 671 इतके असून त्यात पुरुषांचे प्रमाण 60 टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण 40 टक्के आहे. 40 ते 49 या वयोगटातील 12 लाख 7 हजार 451 जणांना कोरोनासंसर्ग झाल्याची नोंद पालिकेने 25 जुलैच्या अहवालामध्ये केली आहे.
तरुणांचे प्रमाणही सर्वाधिक
20 ते 29 या वयोगटातील 11 लाख 1 हजार 860 तरुणांना कोरोनासंसर्ग झाल्याचे दिसून येते. यातील 60 टक्के प्रमाण हे तरुणांचे आहे तर, 40 टक्के तरुणींना संसर्ग झाला आहे. तर, 0 ते 09 वयोगटातील एकूण 13 हजार 162 लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात 55 टक्के लहान मुलांना आणि 45 टक्के लहान मुलींना संसर्गाची नोंद करण्यात आली आहे. तर, 10 ते 19 या किशोवयीन गटातील 33 हजार 736 एवढा मुलांना संसर्ग झाला असून यात 56 टक्के मुले आणि 44 मुली बाधित झाल्या आहेत. पालिकेच्या अहवानानुसार, प्रत्येक वयोगटातील कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये सरासरी 60 टक्के पुरुषांना संसर्ग झाला आहे.
60 ते 69 वयोगटात सर्वाधिक मृत्यू
मुंबईत सर्वाधिक मृत्यू 60 ते 60 या वयोगटात झाले असून आतापर्यंत 4 हजार 359 एवढे मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्याखालोखाल 3 हजार 722 मृत्यू 70 ते 79 या वयोगटातील झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15, हजार 766 मृत्यू झाले आहेत. तर, मृत्यूंचे प्रमाण 1 टक्क्यांवरुन 2.15 टक्क्यांवर पोहोचले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.