मुंबई: वांद्रे फॅमिली कोर्टात (family court) एका व्यक्तीचा सहाव्या मजल्यावरच्या जिन्यावरुन पडून मृत्यू झाला. नितीन कसबेकर (३२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते वरळी येथे रहायचे. घटस्फोट (divorce) खटल्यासंदर्भात ते फॅमिली कोर्टामध्ये आले होते, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. नितीन कसबेकर यांना फिटचा त्रास होता. सातव्या मजल्यावर लिफ्टमधून (lift) बाहेर आल्यानंतर ते सहाव्या मजल्याचे जिने उतरत होते. त्यावेळी जिन्यावरुन पडून त्यांचा मृत्यू झाला. (Mumbai Man dies after fall from the sixth floor in the court just before the divorce proceedings)
ही घटना घडली, त्यावेळी कसबेकर यांचे शेजारी त्यांच्यासोबत होते. कसबेकर यांचे शेजारी अॅलेक्स, कसबेकरांची पत्नी, सहावर्षाच मुलगा आणि वकिल पुढे चालत असताना नितीन जिन्यावरुन खाली कोसळल्याचा मोठा आवाज झाला.
वांद्रे-कुर्ला पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात कुठेही काहीही घातपाताचा प्रकार आढळलेला नाहीय. नितीन कसबेकर कॉमर्स ग्रॅज्युएट होता. त्याच्याकडे कायमस्वरुपी नोकरी नव्हती. एसआरए प्रोजेक्टसाठी कागदपत्रांची कामे तो करायचा. त्याने आणि त्याच्या पत्नीने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
कसबेकर मागच्या दोन वर्षांपासून एकटा राहत होता. काल त्याच्या बहिणीने त्याच्या शेजाऱ्यांना फोन केला व कसबेकरची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याच्यासोबत जाण्यास सांगितले. कसबेकर त्याची पत्नी, मुलगा आणि वकिल सातव्या मजल्यावर गेले. तिथून ते सहाव्या मजल्यावर येत असताना जिन्यावरुन पडून कसबेकरचा मृत्यू झाला असे बीकेसीचे पोलीस निरीक्षक प्रदीप मोरे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.