३० जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावीद यांना प्रोस्थेटिक लेगचा आधार

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावले.
३० जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावीद यांना प्रोस्थेटिक लेगचा आधार
Updated on

मुंबई: मागच्यावर्षी २४ ऑगस्टला म्हाडमध्ये इमारत दुर्घटना (mahad building collapsed) घडली होती. तारीक गार्डन ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही घटना घडली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काही जण पटकन मदतीसाठी धावले. नावीद दुस्ते (Naveed Duste) त्यापैकीच एक. नावीद त्यावेळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावले. त्यांनी जी हिम्मत दाखवली, त्यामुळे ३० लोकांचे प्राण वाचले. आजही या शौर्याबद्दल त्यांची आठवण काढली जाते. (Mumbai man Naveed Duste gets prosthetic limb a year after losing his leg while saving 30 lives)

नावीद त्यावेळी दुर्घटनाग्रस्ताना मदत करत असताना स्वत: जखमी झाले. एका वयोवृद्ध महिलेला बाहेर काढत असताना, ते स्वत: स्लॅबखाली अडकले. स्लॅबच्या वजनाच्या भारामुळे त्यांनी त्यांचा उजवा पाय गमावला. शरीराचा एखादा अवयव गमावल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलून जातं. इतर बऱ्याच गोष्टींसाठी तडजोड करावी लागते. आता नावीद यांना प्रोस्थेटिक लेगचा आधार मिळाला आहे. हा कृत्रिम पाय आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

३० जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावीद यांना प्रोस्थेटिक लेगचा आधार
'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'

"आता मी चालू शकतो, स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. आता कुटुंबाला आधार देण्यासाठी मला नोकरीची गरज आहे" असे नावीद सांगतात. नावीद यांना मंगळवारी प्रोस्थेटिक पाय बसवण्यात आला असून पुढचे काही आठवडे त्यांना फिजियोथेरपीचा आधार घ्यावा लागणार आहे. "प्रोस्थेटिक लेगमुळे मला आत्मविश्वास मिळाला आहे. माझे आजारी वडिल आणि कुटुंबाच्या मदतीसाठी मला नोकरी करायची आहे. पायाशिवाय आयुष्य काय असतं? हे मी शब्दात नाही व्यक्त करु शकतं. आता मी काहीतरी करु शकतो हा माझ्यामध्ये विश्वास आहे" असे नावीद सांगतात.

३० जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावीद यांना प्रोस्थेटिक लेगचा आधार
"करावं तसं भरावं लागतंच"; नारायण राणेंचा अनिल देशमुखांना टोला

नावीद यांचे म्हाडमधील राहते भाड्याचे घर दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे ते कुटुंबासोबत आता नातेवाईकांकडे राहतात. "नावीद दुस्ते हे कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. समाजातील काही चांगल्या लोकांनी, नातेवाईकांनी मदत केली त्यामुळे त्यांच्या कुटुंबाल तग धरता आला" असे परवेझ म्हणाले. ते नावीद यांचे नातेवाईक आहेत. या प्रोस्थेटिक लेगचा खर्च ३.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असून हा कृत्रिम अवयव १५ वर्षापर्यंत वापरता येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()