Mumbai : गणेश मूर्ती शाडू किंवा पर्यावरणपूरकच बनवणे बंधनकारक; पालिकेची नियमावली

Ganesh Idols
Ganesh Idols
Updated on

मुंबई - गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. त्यानुसार मूर्तिकार, विक्रेत्यांसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. पालिकेने या नियमावलीत घरगुती मूर्ती असल्यास शाडू किंवा पर्यावरणपूरकच बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Ganesh Idols
Mumbai Rain : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील भाग खचला! स्थानकासह मेट्रोच्या खांबानाही धोका

मूर्ती पर्यावरणपूरक आहे हे कसे समजायचे यासाठी मूर्तीच्या मागे उजव्या खांद्यावर हिरव्या रंगाचे वर्तुळ आणि ‘पीओपी’ची असल्यास लाल रंगाच्या वर्तुळाचे मार्किंग करणे आवश्यक आहे, तसे निर्देशही मूर्तीकारांना देण्यात आले आहेत. पालिका अधिका-यांकडून याबाबत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत गणेशोत्सवाआधी दोन -तीन महिने आधीपासूनच मूर्तीकारांमकडून तयारी सुरु होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने मूर्तीकारांसाठी नियमावली तयार केली आहे. आज गणेशोत्सवाबाबत पहिली नियमावली जाहीर केली आहे. यासाठी यंदा मूर्तिकारांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पर्यावरणपूर्वक मूर्ती असणे बंधनकारक असणार आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती आहे, तशाप्रकारचा फलक मूर्तिकारांनी मूर्ती तयार केल्या जातात त्या ठिकाणच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहणार आहे. तर सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यांनी पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ganesh Idols
Mumbai News: वृक्ष कोसळून तरुणाचा मृत्यू, दिवसभरातील दुसरी दुर्घटना

पालिकेकडून याबाबत वेळोवेळी जाहीर केले जात असतानाही नियम मोडल्याचे आढळल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार संबंधित कारवाईस पात्र राहील असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मूर्तिकारांना शाडूची मोफत माती व जागा

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेने भर दिला आहे. याबाबत सातत्याने पालिकेकडून सूचना दिल्या जात आहेत. पर्यावरण पूरक शाडू मूर्ती बनवणा-यांना सवलतही दिली जाणार आहे. यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर ’प्रथम येणार्‍यास, प्रथम प्राधान्या’नुसार जागा आणि शाडूची माती मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी मूर्तिकारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत पालिकेला हमीपत्र लिहून द्यावे लागले. पालिका कोणत्याही वेळी याची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करणार आहे.

अशी आहे नियमावली

- घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती चार फुटांचीच असावी.

- सर्व घरगुती मूर्तींचे विसर्जन कृत्रीम तलावातच करावे.

- कमी उंचीच्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कृत्रीम तलावात.

- मूर्तिकारांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगी मिळणार.

- परवानगीसाठी विभाग कार्यालयातही अर्ज करता येणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.