बुलेट चालकांनो गाडी ठेवा जपून नाहीतर, अवघ्या 20 सेकंदात होईल गायब

बुलेट चालकांनो गाडी ठेवा जपून नाहीतर, अवघ्या 20 सेकंदात होईल गायब
Updated on

मुंबई - नवी मुंबई पोलिसांनी बुलेट दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या एकूण 44 बुलेट जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे ठग बुलेट दुचाकीचे इग्नेशन फक्त 10 ते 20 सेकंदात तोडून दुचाकी घेऊन पोबारा करीत असत. या ठगांनी बुलेट चोरी साठी लावलेल्या या शोधामुळे कंपनीची त्रुटी समोर आली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बुलेट कंपनीला दुचाकीतील त्रुटी बाबत कळवणार आहे.

नवी मुंबई परिसरात लॉकडाऊनपासून बुलेट चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात आले. आयुक्त डॉ.बी.जी.पाटील यांच्या गुन्हे शाखेने एक पथक नेमले. या पथकाने बुलेट चोरीच्या पॅटर्नचा अभ्यास केला. घटनास्थळांना भेटी देऊन सविस्तर माहिती पुरावे गोळा केले. त्या आधारे आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. यामध्ये सोहेल इम्तियाज शेख, सौरभ कारंजे आणि अमोल ढोबळे यांची नावे आहेत.  यातील अमोल ढोबळे याला महापे येथील हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली, अमोल हाच या गृपचा लीडर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर अहमदनगर, पुणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हे आऱोपी इतर अनेक दुचाकी वगळता, बुलेटचीच का चोरी करीत होते. याबाबत पोलिसांच्या अभ्यासातून काही धक्कादायक माहिती समोर आली. अमोल काही दिवसांपूर्वी गोव्याला गेला असता त्यांने पैशासाठी बुलेटची चोरी केली होती. बुलेट चोरी त्याला सोपे सहज वाटत होते. त्याला ग्राहकही सहज मिळत होते. त्यामुळे त्याला चोरीची आणखी हाव होत गेली. चोरलेल्या बुलेट विकण्यासाठी सोहेल शेख आणि सौरभ कारंजे त्याला बनावट पेपर बनवुन देत असत. बुलेटचे इग्नेशन ते इंजिन दरम्यानची वायर तोडून 200 ते 300 रुपयांना नवीन इग्नेशन घेऊन ते पुन्हा बसवत असत. त्यानंतर बुलेट सुरू करून सहज पोबारा करीत होते.

साधारणतः सर्व दुचाक्यांमध्ये इग्नेशन आणि हॅण्डल लॉकची जागा एकाच ठिकाणी असते. बुलेट दुचाकी याबाबतीत वेगळी आहे. बुलेटचे हॅंण्डल लॉक हॅण्डलच्या खाली असते. चालक नेहमीच हॅण्डल लॉक लावतात असे नाही. अनेक वेळा ते न लावताच चालक निघून जातात.  हे चोरटे अशा दुचाक्या आरामात चोरत असत. या बुलेटचे इग्नेशन कनेक्शन तोडून त्याठिकाणी नवीन इग्नेशन बसवले की. दुचाकी सुरू होते. त्यानंतर आरोपी ती चोरी करीत असत.  आऱोपी या बुलेट चोरी केल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विकत असत. त्याकरीता लागणारे बनावट कागदपत्र ते बनवत असत. याच आधारे बुलेट 40 ते 60 हजारात विकल्या जात होत्या. 

-----------------------------------------------------------------

Mumbai marathi crime latest news Navi Mumbai police have arrested three accused for stealing a bullet bike

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.