"मुंबई मराठी ग्रंथालय कार्यकारी मंडळाची नियुक्ती बेकायदेशीर"

आम आदमी पक्षाचा आरोप
priti-sharma-menon
priti-sharma-menonsakal media
Updated on

मुंबई: ऐतिहासिक परंपरा (historical tradition) लाभलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे नियम आणि घटना पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप ‘आप’च्या (aam aadmi party) मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन (preeti sharma menon) यांनी केला आहे. कार्यकारी मंडळ निलंबित करून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

priti-sharma-menon
सणासुदीच्या काळात FDA ची करडी नजर; डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आदेश

सध्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व्यवस्थापनाचे काम घटनेनुसार सुरू नाही. १९८९ चे संविधान सदस्याला तीन वर्षांच्या कार्यकाळाची मुदत देते. मात्र, प्रत्यक्षात व्यवस्थापन समिती पाच वर्षांसाठी कार्यरत आहे. घटनेनुसार सर्वसाधारण सभेमध्ये विश्वस्तांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र, आजपर्यंत हे झाले नाही. सर्व नियुक्त्या केवळ नियामक मंडळाच्या बैठकीत झाल्या, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर ग्रंथालय कार्यात सहभागी झाल्यापासून हे सर्व प्रकार होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

"मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी रविवारी (ता. २४) होणारी निवडणूक नियमानुसार आणि घटनेतील तरतुदीनुसार आहे. ही निवडणूक तीनऐवजी पाच वर्षांची का, यावर काही जणांनी आक्षेप घेतले असले, तरी त्यासाठी घटनादुरुस्ती झालेली आहे. त्याचा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांना सादर केलेला आहे. या निवडणुकीत मी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. निवडणुकीनंतर याविषयी होत असलेल्या आक्षेपांवर मी निश्चित बोलणार आहे."
- डॉ. भालचंद्र मुणगेकर, उपाध्यक्षपदाचे उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.