Weekend Lockdown सर्वांना परवडण्यासारखा - पेडणेकर

Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown
Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown
Updated on

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनासाठी बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली. लक्षणं असलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या सर्वांना बेड्स पुरवण्याची सोय मनपा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं ऑक्सिजनचे बेड्स जवळपास १९ हजार असणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. आयसीयू बेड्स सात हजार एकूण २२ हजार खाटांची सोय करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. (Kishori Pednekar Statement On Mumbai Lockdown)

मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा या सगळ्याचा सामना करणं आवश्यक आहे असं पेडणेकर यांनी सांगितलं. (Mumbai Mayor on Corona) ओमिक्रॉनबद्दल गंभीरता बाळगणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

वीकएंड लॉकडाऊन लागणार का?

मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकएंड लॉकडाऊनबद्दल महापौरांनी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री कडक निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊनबद्दल निर्णय जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू असल्याचं महापौर म्हणाल्या.(Kishori Pednekar News Updates)

परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आम्ही त्यावर नियंत्रण मिळवणार आहोत. त्यासाठी खंबीरपणे निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत. पालिकाही सज्ज आहे. मात्र नागरिकांनी फज्जा उडवू नये. सगळ्यांनी मास्क वापरल्यानंतर मार्शल्स त्रास देणार नाहीत, असं महापौर म्हणाल्या.

महापौरांचे महत्त्वाचे मुद्दे

मिनी लॉकडाऊन सगळ्यांना परवडण्यासारखा आहे

पंतप्रधान आज संध्याकाळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

आमची यंत्रणा सज्ज आहे , पण सज्ज आहोत म्हणजे फज्जा उडाला नका

लोकांनी नियम पाळले तर मर्शलची गरज लागणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.