मुंबईच्या महापौरांनी उत्तर दिलं, 'तुझ्या बापाला'

लशींचे कॉण्ट्रॅक्ट कुणाला दिलं, असा प्रश्न होता
kishori pednekar
kishori pednekar file photo
Updated on

मुंबई: BMC ने लस खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. त्यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दीक लढाई रंगली आहे. लस खरेदीच्या (vaccine purchase) प्रक्रियेवरुन भाजपा आणि मनसेच्या नेत्यांकडून सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. आता याच मुद्यावरुन महापौर किशोर पेडणेकर (kishori pednekar) यांच्या एका टि्वटवरुन वाद निर्माण झाला आहे. महापौरांकडून अशा प्रकारचं टि्वट अपेक्षित नसल्याने नंतर त्यांनी ते टि्वट डिलीट केलं. (Mumbai Mayor kishori pednekar objectionable language in tweet triggers row)

महापालिकेच्या लस खरेदीवर एका टि्वटर युझरने प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांनी आक्षेपार्ह शब्दांमध्ये उत्तर दिले. ते टि्वट व्हायरल झाल्यानंतर महापौरांनी लगेच डिलीट केलं. महापौरांनी जी भाषा वापरली, त्याबद्दल मुंबई भाजपाने महापौरांचा समचार घेतला आहे. "लशींचे कॉण्ट्रॅक्ट कुणाला दिलं, असा प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकराला 'तुझ्या बापाला' असं उत्तर देणाऱ्या महापौर @KishoriPednekar यांनी आपल्या पक्षसंस्कृतीचं दर्शन घडवलंय. ते ट्वीट महापौरांनी डीलीट केलं असलं तरी मुंबईच्या प्रथम नागरिकाची ती असभ्य अक्षरं कायमची कोरली गेलीच.#जनाबसेना" असं टि्वट मुंबई भाजपाने केलं आहे.

kishori pednekar
पोलिसाने बाईक अडवून सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि त्यानंतर...

अनेक सोशल मीडिया युझर्सनी महापौरांच्या विधानावर आक्षेप घेत माफीची मागणी केली आहे. "मुंबईच्या पहिल्या नागरिक या नात्याने त्यांच्याकडून सार्वजनिक जीवनात चांगली भाषा अपेक्षित आहे" अशी टीका भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.

kishori pednekar
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सापडल्या गोड्या पाण्याच्या विहिरी

महापौरांनी त्यांच्या पदाचा आदर राखला पाहिजे, असे समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख म्हणाले. किशोरी पेडणेकर दक्षिण मुंबईतील लोअर परेल भागातून येतात. तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांची २०१९ साली मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()